Ajab Gajab Job Offer : सध्या बेरोजगारांची संख्या वाढली आहे. एका पदासाठी असंख्य अर्ज येत असल्याने जॉब मिळवणे कठीण झाले आहे. अशातच एका एका कंपनीने Ajab Gajab Job Offer दिली आहे. ही कंपनी गांजा ओढण्याचा 88 लाख पगार देत आहेत. या अजब नोकरीची (Weird Jobs) जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
हातात काम नसल्याने अनेक बेरोजगार मिळेन ते काम करण्यासा तयार होतात. पण जगात असे अनेक लोक आहेत जे सर्व काही माहीत असूनही विचित्र नोकऱ्या करायला तयार होतात. या नोकऱ्यांमध्ये मोठ्या धोका असतो. अशीच ही गांजा ओढण्याची नोकरी आहे.
एका जर्मन कंपनीने 'Cannabis Sommelier' या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही एक विड कंपनी आहे. कंपनीला आपल्या प्रोडक्ट टेस्टींगसाठी 'प्रोफेशनल स्मोकर'ची गरज आहे. या नोकरीसाठी निवडलेल्या कर्मचार्यांना कंपनी 88 हजार पौंड म्हणजेच सुमारे 88 लाख रुपये पगार देत आहे.
आपल्या उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी 'वीड एक्स्पर्ट' शोधत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कोलोन-आधारित कॅनामेडिकल जर्मन फार्मसीमध्ये औषधी भांग अर्थात औषधी गांजा विकला जातो. याच प्रोडक्टच्या टेस्टींगसाठी कंपनी 'वीड एक्स्पर्ट' हे पद भरत आहे.
'वीड एक्स्पर्ट' या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीला याचा वास, याचे सेवन केल्यानंतर येणारा अनुभव याचे निरीक्षण करावे लागणार आहे. यासाठीच कंपनी धुम्रपान करू शकतील अशा लोकांचा शोध घेत आहे.
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल, मॅसेडोनिया आणि डेन्मार्क सारख्या देशांमध्ये कंपनीला आपल्या उत्पादनांच्या मानकांचे सतत निरीक्षण करायचे आहे. या पदावर नियुक्त झालेल्या कर्मचार्याला जर्मनीमध्ये वितरित केलेल्या सामग्रीची गुणवत्ता देखील तपासावी लागणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ डेविड हेन यांनी दिली. या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे गांजा ओढण्याचा परवाना असने बंधनकारक आहे.
भारतात गांजा ओढण्यावर बंदी आहे. यामुळेच येथे गांजा विक्री बेकायदेशीर मानली जाते. मात्र, अमेरिकेसारख्या देशांमध्ये गांजाचे सेवन करने हे कायदेशीर आहे. यामुळेच येथे अनेक मेडिकल स्टोरमध्ये देखील गांजा विकला जातो. गांजामध्ये काही औषधी गुणधर्म असल्याचा दावा केला जात आहे. आकडी येणे, मानसिक आजार आणि कॅन्सरचे रुग्ण, तसंच त्वचाविषयक आजारांवर गांजाचा वापर औषध म्हणून केला जातो. गांजा ओढण्याचा परवाना असलेल्या व्यक्तींना मेडिकल स्टोरमधून गांजा खरेदी करता येवू शकतो.