एका राजकुमाराशी कितीजणींचं नातं? प्रिन्स हॅरी यांच्या व्हर्जिनीटीबाबत खळबळजनक दावा करणारी 'ती' कोण?

Prince Harry : ब्रिटनच्या शाही कुटुंबाविषयी अनेकांनाच प्रचंड कुतूहल. पण, यावेळी मात्र या कुतूहलाचं कारण जरा वेहळं आहे. कारण या कुटुंबातील राजकुमाराविषयीची खासगी माहिती समोर आलीये.... 

Updated: Feb 13, 2023, 02:55 PM IST
एका राजकुमाराशी कितीजणींचं नातं? प्रिन्स हॅरी यांच्या व्हर्जिनीटीबाबत खळबळजनक दावा करणारी 'ती' कोण?  title=
Prince Harry came in limelight as a women claimed she had physical relationship with him

Prince Harry : ब्रिटनच्या (Britain Royal Family) राजघराण्याशी खास नातं असणाऱ्या प्रिन्स हॅरी (Prince Harry) यांच्या नावाची बरीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. प्रिन्स हॅरी चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे त्यांचं एक पुस्तक. 'स्पेयर' या पुस्तकामध्ये ब्रिटनच्या राजघराण्याबाबत अनेक मोठे खुलासे आणि दावे त्यांच्यामार्फत करण्यात आले आहेत. हॅरी यांना या पुस्तकातून आणखी जवळून पाहण्याची संधीही याच पुस्तकानं दिली आहे. 

वयाच्या 17 व्या वर्षीच... 

सहसा राजघराण्याची गुपितं सहजासहजी बाहेर येत नाहीत. पण, हॅरी यांनी मात्र आपण 17 व्या वर्षीच Virginity गमावल्याचा खुलासा केला. बरं हा गौप्यस्फोट इतक्यावरच थांबलेला नाही. कारण, आता प्रिन्स हॅरी यांच्याशी शरीरसंबंध ठेवलेल्या महिला आता समोर येत असून, आपण त्यांच्यासोबत खास नात्यामध्ये होतो असाही दावा करु लागल्या आहेत. (Prince Harry came in limelight as a women claimed she had physical relationship with him)

तो क्षण लाजिरवाणा... 

आपल्या पुस्तकातून प्रिन्स हॅरी यांनी पहिल्यांदाच एखाद्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा अनुभव लाजिरवाणा असल्याचं सांगितलं. आपल्याहून वयानं मोठ्या महिलेनं एका पबमागे गवतावरच आपल्यासोबत संबंध ठेवल्याचं त्यांनी या पुस्तकात म्हटलं. त्यांनी या पहिल्या अनुभवाचा उल्लेख 'इनग्लोरियस एपिसोड' म्हणून केला आहे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण 2018 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार एका वयोवृद्ध महिलेला प्रिन्स हॅरी यांना Sex संबंधित माहिती देण्यासाठी नेमण्यात आलं होतं. आश्चर्य म्हणजे 87 वर्षीय अमांडा बॅरी यांनी आपली याच कामासाठी नेमकणूक झाल्याचा दावाही केला होता. 

कोण आहे ही महिला? 

40 वर्षीय साशा वालपोलचं नाव यात बरंच चर्चेत आलं आहे. साशानं केलेल्या दाव्यानुसार प्रिन्स हॅरी यांनी त्यांची व्हर्जिनीटी साशासोबतच गमावली. तर, दुसऱ्या एका महिलेच्या दाव्यानुसार हॅरी यांचे तिच्यासोबत शारीरिक संबंध होते. इतकंच नव्हे तर हे नातं सर्वांसमोर आणत त्यांनी आपलं जगणं कठीण केल्याचा नाराजीचा सूरही तिनं आळवला. 

हेसुद्धा वाचा : प्यार भी क्या चीज हैं... 'ही' राजकुमारी आहे तरी कोण? जिनं नकार दिल्यावर 13 जणांनी दिला होता जीव

जे शाही कुटुंब आणि ज्यांचा शिष्ठाचार साऱ्या जगालाच भारावतो त्या कुटुंबाची ही बाजू समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली होती.