जनावरांप्रमाणे 4 पायांवर चालणारं कुटुंब; वैज्ञानिकांनाही न उलगडलेलं कोडं, काय आहे रहस्य?

या कुटुंबात राहणाऱ्या पाचही भावा बहिणींसंबंधी 2000 च्या दशकात एक अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर विस्तारपणे भाष्य करण्यात आलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Sep 2, 2023, 03:44 PM IST
जनावरांप्रमाणे 4 पायांवर चालणारं कुटुंब; वैज्ञानिकांनाही न उलगडलेलं कोडं, काय आहे रहस्य? title=

जगभरात अने अशी कुटुंबं आहेत ज्याच्या सवयी फार अजब आणि इतरांपेक्षा वेगळ्या असतात. आपल्या या अजब सवयींमुळे ही कुटुंब चर्चेचा विषय ठरत असतात. यादरम्यान, एक असं कुटुंब सध्या चर्चेत आलं आहे जे माणसांप्रमाणे नव्हे तर जनावरांप्रमाणे चार पायांवर चालतात. हे सर्वजण आपल्या दोन्ही हातांना पायांप्रमाणे वापरतात. हे  कुटुंब टर्कीमधील गावात राहतं. या कुटुंबात राहणाऱ्या पाच बहिणी भावांसंबंधी 2000 मध्ये अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या या चालण्याच्या पद्धतीवर विस्तृतपणे भाष्य करण्यात आलं होतं. 

हा अभ्यास प्रसिद्ध झाल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) मानसशास्त्र प्राध्यापक निकोलस हम्फ्रे या कुटुंबाला भेटण्यासाठी टर्कीला गेले होते. उलास कुटुंबातीला या जोडप्याला 18 मुलं होती. पण यातील फक्त सहाजण असे आहेत, ज्यांना जनावरांप्राणे चालणं आवडतं. हा असा प्रकार याआधी कधीही पाहण्यात आलेला नाही. या कुटुंबावर एक माहितीपटही तयार करण्यात आला आहे. 60 मिनिट्स ऑस्ट्रेलियाने हा माहितीपट तयार केला आहे. सध्याच्या आधुनिक युगात एखादी व्यक्ती पुन्हा पशुवस्थेत परत जाईल असं मला वाटलं नव्हतं असं हम्फ्रे यांनी म्हटलं आहे. 

"यांचं अस्तित्वचं नसलं पाहिजे"

निकोलस हम्फ्रे यांचं म्हणणं आहे की, जी गोष्ट माणसाला जनावरांपासून वेगळं करते ती म्हणजे दोन पायांवर चालणं. याशिवाय भाषा, संवाद आणि इतर गोष्टीही आहेत. पण या कुटुंबातील सहा जणांनी हद्दच पार केली आहे. 

माहितीपटात, उलास कुटुंबाचे वर्णन मानव आणि वानर यांच्यातील गहाळ दुवा म्हणून करण्यात आलं होतं, ज्यांचं अस्तित्व नसावं. त्यांच्या चालण्याच्या पद्धतीमागे नेमकं काय कारम आहे हे अद्यापही रहस्यच आहे. 

काही तज्ज्ञांच्या मते, अनुवंशिक समस्येमुळेही असं होऊ शकतं. या सहा बहिण, भावातील पाच जण जिवंत असून त्यांचं वय 22 ते 38 वर्षं आहे. सर्वजण ब्रेन डॅमेजच्या एका विशिष्ट स्वरूपाचे पीडित आहेत. डॉक्‍टरांनी माहितीपटात, एमआरआय स्कॅनदेखील दाखवलं, ज्यात असं दिसून आले की त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या मेंदूचा एक भाग संकुचित झाला आहे, ज्याला सेरेबेलर वर्मिस म्हणतात. 

पण याचा अर्थ असा होत नाही की, त्यांनी जनारांप्रमाणे चार पायावर चालावं. कारण सेरेबेलर वर्मिस असणारे इतर लोक माणसाप्रमाणेच दोन पायांवर चालतात. या कुटुंबातील लोक पायाचा वापर चालण्यासाठीच करतात. या कुटुंबावर अनेक माहितीपट तयार करण्यात आले असून, तुम्हीही ते पाहू शकता.