Met Gala Cockroach Video: सध्या जगभरात चर्चा आहे ती म्हणजे 'मेट गाला 2023' या दिमाखदार सोहळ्याची. जगभरातील अनेक नामवंत सेलिब्रेटी (Met Gala 2023) हे या सोहळ्याला उपस्थित होते. येथे सर्वात जास्त चर्चा रंगते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या फॅशनची परंतु आता येथे आलेल्या एका झुरळानं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. मेट गाला मध्ये शिरलेल्या झुरळाचा लाईव्ह व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या तीक्ष्ण नजरेनं पापाराझींनी या झुरळाला शोधून काढलं आणि त्याचा फोटो काढण्यासाठीही (Cockroach in Met Gala 2023) बरीच धडपड केली.
ही सर्व गंमत एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तेव्हा अतिउच्चभ्रु अशा मेट गाला सोहळ्याला आलेल्या झुरळानं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ठरला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात मेट गाला पार पडला. यावेळी प्रियंका चोप्रा, नताशा पूनावाला, ईशा अंबानीसह अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) पहिल्यांदाच हजेरी लावली होती. यावेळी या सेलिब्रेटींचा रेड कार्पेट जलवाही पाहायला मिळाला. परंतु या रेड कार्पेटवर एक नवा पाहूणा आला आणि तो म्हणजे झुरळं. हे झुरळं मेट गालामध्ये इथून तिथे फिरतं होतं. अशा या न भूतो न भविष्यति घटनेला कॅमऱ्यात कैद करण्यासाठीही पापाराझींची झुंबड लागली होती. (a cockroach enters in met gala 2023 event photographers clicks photos trollers reacts)
या झुरळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मेट गालाला गेल्यावर काहीतरी वेशभूषा ही करावीच लागते त्याशिवाय आपण या मेट गालाचे पाहूणे होत नाही तेव्हा सध्या हे झुरळं आल्यामुळे त्यालाही काहीतरी वेशभुषा असली पाहिजे म्हणून मीमकरांना आपली कल्पनाशक्ती पणाला लावली आणि या झुरळांसाठीही खास आऊटफिट तयार केला. सध्या हे मीम्सही (Memes) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
The final guest of the evening at tonight's #MetGala ... A freaking cockroach hahahahaha pic.twitter.com/BYNUBttAM4
— Nọ́lá Thee Journalist (@NolaMarianna) May 2, 2023
मेट गाला हा शो सर्वात लोकप्रिय असा शो आहे. येथे अनेक नामवंत सेलिब्रेटी हजेरी लावतात. यावेळी मेट गालाला आलेल्या सेलिब्रेटींची फॅशन ही साधी नसतेच. आगळ्यावेगळ्या कलाकृतीसह आपल्यासोबत आऊट ऑफ द बॉक्स अशी अतरंगी किंवा विक्षिप्त फॅशन रेड कार्पेटवर (Met Gala Red Carpet) अवतरते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
The cockroach at #MetGala pic.twitter.com/0INMVqkSzn
— Javier (@jvrcsb) May 2, 2023
कारण येथे आलेल्या आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करतात आणि आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. हा सोहळ्या सामान्य नसतो. येथे तुम्हाला प्रत्येक लुकमध्ये काहीतरी वेगळं पाहायला हे मिळतंच मिळतं. या सोहळ्याच्या याच वेगळेपणामुळे हा सोहळा जगभरात लोकप्रिय आहे. येथे भारतीय सेलिब्रेटींचीही हजेरी लागते. यावेळी दीपिका पादूकोण मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेली दिसली नाही.