सुनेसाठी काहीही..., आजीनं दिला नातीला जन्म, जाणून घ्या विज्ञानाचा चमत्कार

विज्ञानाच्या मदतीनं कोणतीही गोष्ट शक्य आहे. 

Updated: Nov 6, 2022, 03:28 PM IST
सुनेसाठी काहीही..., आजीनं दिला नातीला जन्म, जाणून घ्या विज्ञानाचा चमत्कार title=

मुंबई : Science आता खूप पुढे गेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कधी आपल्याला काय चमत्कार पाहायला मिळणार हे आपण सांगू शकत नाही. नुकतीच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या एपिसोडमध्ये एका महिलेनं तिच्या नातीला जन्म दिला आहे. हे सगळं सरोगसीच्या माध्यमातून शक्य झालं आहे. ही महिला अमेरिकेची असून तिचं नाव नॅन्सी हॉक असं आहे. सरोगसीच्या माध्यमातून ही महिला गरोदर राहिली आणि आता महिलेने एका मुलीला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

मुलगा आणि सुनेच्या मुलीला दिला जन्म 

ही घटना अमेरिकेतील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 56 वर्षीय नॅन्सी हॉक यांनी स्वतःचा मुलगा आणि सुनेच्या पाचव्या मुलाला जन्म दिला आहे. सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचा निर्णय घ्यावा लागला, कारण त्यांची सून कांब्रियावर अशी एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती ज्यामुळे तिला मूल होऊ शकत नव्हतं. (Surrogate Grand-Mother)

मुलीच्या जन्मानंतर नॅन्सी यांच्या मुलानं सांगितलं की, आपल्या आईला अशा अवस्थेत कोणीही पाहू शकत नाही. पण माझ्या आईनं माझ्या बाळाला जन्म दिला हे पाहण्याची संधी मला मिळाली. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पूर्ण नऊ तास प्रसूती वेदना सहन केल्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला आहे.

गरोदरपणातच मुलाचे नाव दिल्याचेही सांगण्यात आले. गरोदरपणात नॅन्सी यांनी त्यांच्या स्वप्नात 'हॅना' हे नाव ऐकले होते, त्यामुळे मुलीचे नाव हॅना आहे, हॅना या नावाचा अर्थ सुंदर असा आहे. या जोडप्याला त्यांचे कुटुंब आणखी वाढवायचे होते, म्हणून त्यांनी सरोगसीचा निर्णय घेतला. (a baby girl born from the womb of grandmother with the help of surrogacy)