अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनाचे 68 हजार नवे रुग्ण वाढले

अमेरिकेत कोरोनाचा कहर कायम, रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

Updated: Jul 26, 2020, 06:27 PM IST
अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनाचे 68 हजार नवे रुग्ण वाढले title=

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने जगातील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कहर केला आहे. जगभरात कोरोना संक्रमणाचा आकडा 1 कोटी 60 लाखाहून अधिक आहे, तर मृतांची संख्या 6 लाख 44 हजारांहून अधिक आहे. दरम्यान, अमेरिकेत गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे 1 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 68 हजाराहून अधिक नवीन रुग्ण वाढले आहेत.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी गेल्या 24 तासांत अमेरिकेत 68 हजार 212 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,067 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमणाची संख्या 41,74,437 वर पोहोचली आहे. तर 1,46,391 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

कॅलिफोर्निया, टेक्सास, अलाबामा आणि फ्लोरिडासारख्या दक्षिणेकडील आणि पाश्चात्य राज्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 12 दिवसांपासून, दररोज नवीन रुग्णांची संख्या 60,000 च्या वर गेली आहे. त्याचबरोबर, गेल्या 4 दिवसांपासून दररोज मृत्यूची संख्या 1 हजाराहून अधिक आहे.