इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश, पुतीन यांना साथ द्यायला इराण आणि चीन?

इस्रायलवरील हल्ला हा केवळ हमासनं घडवून आणला की त्यामागे कोणतं मोठं कारस्थान आहे हे आज आम्ही डिकोड करणार आहोत. इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश असल्याची थिअरी समोर आलीय.  कोणते आहेत हे 3 देश.

Updated: Oct 10, 2023, 11:49 PM IST
इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश,  पुतीन यांना साथ द्यायला इराण आणि चीन?  title=

Israel-Hamas war updates: इस्रायलवर हमासनं रानटी पद्धतीनं हल्ला केला. मात्र या हल्ल्यामागे तीन थिअरी असल्याचं सांगितलं जातंय. रशिया, चीन आणि इराण या देशांनी हमासला बळ दिल्याची चर्चा आहे.मात्र इस्रायलवर हल्ला करण्यात चीन, रशिया किंवा इराणला इतका इंटरेस्ट का होता?

थिअरी नंबर 1, हल्ल्यामागे इराण 

इराण इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू देश मानला जातो. इस्रायलच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात इस्रायलनं मोहीम उघडली होती. इराणच्या अण्वस्त्रं कार्यक्रमाला विरोध करण्यात इस्रायलला अमेरिकेची साथ आहे. अण्वस्त्र कार्यक्रमावरुन इस्रायलचं लक्ष मोठ्या काळासाठी हटवण्यासाठी इराणनं हमासला बळ दिलं. इस्रायलला झटका देत अमेरिकेला डिवचायचं, अण्वस्त्रं कार्यक्रमात रशियाची साथ भक्कम करायची अशी एक थिअरी मांडली जातेय.

थिअरी नंबर दोन

अर्थात हल्ल्यामागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अमेरिकेला मध्य-पूर्वेत गुंतवून ठेवणं. अमेरिका मध्य-पूर्वेत गुंतली तर युक्रेनला अपेक्षित मदत करु शकणार नाही आणि त्याचा फायदा रशियाला होईल. रशियन तेलावर युक्रेन युद्धानंतर युरोपातील अनेक देशांनी बहिष्कार घातलाय.. मध्य-पूर्वेतल्या युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढतील आणि त्याचा थेट फायदा रशियन तेल निर्यातीला होईल. रशियाची अर्थव्यवस्था सुधारायला मदत होईल. युक्रेनला मदत केल्याबद्दल पुतीनना अमेरिकेला धडा शिकवायचा होता. अमेरिकेला झटका देण्यासाठी मित्रराष्ट्र इस्रायलवरील हल्ल्याला रशियानं मदत केली

थिअरी नंबर तीन इस्रायल हल्ल्यामागे चीनचा हात 

द बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह अर्थात BRI प्रोजेक्टच्या यशासाठी चीनला मध्यपूर्वेत पाय रोवायचे आहेत. BRI प्रोजेक्ट मध्यपूर्वेतून जातं जिथे अमेरिकेचा हस्तक्षेप आहे. अमेरिकेचा मध्य-पूर्वेत दबदबा पाहाता BRI प्रोजेक्टला धोका आहे असं चीनला वाटतं. मुस्लिम देश अमेरिका आणि पर्यायानं इस्रायलविरोधात एकत्र आले तर त्याचा फायदा चीन उचलू शकेल आणि मध्यपूर्वेत पाय रोवू शकेल. त्यामुळेच आपलं प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी चीननं हमासला बळ दिलं आणि हल्ला घडवून आणला. 
हमासनं ज्या नियोजनबद्धपद्धतीनं हल्ला केला, ते पाहता हमासमागे कोणतीतरी मोठी महाशक्ती आहे अशा थिअरीस समोर येतायत.. इस्रायलवरील हल्ला ही तिस-या महायुद्धाची ठिगणी तर नाही ना अशी भिती व्यक्त केली जातेय.