इस्त्रायलचा स्ट्राईक, गाझात वातावरण टाईट; हमासवर इतिहासातला सर्वात मोठा एअरस्ट्राईक

हमास विरूद्ध इस्रायल युद्ध चांगलंच पेटलंय. आता हमासचा नायनाट करण्याचा चंगच इस्रायलनं बांधलाय. 

Updated: Oct 10, 2023, 11:00 PM IST
इस्त्रायलचा स्ट्राईक, गाझात वातावरण टाईट; हमासवर इतिहासातला सर्वात मोठा एअरस्ट्राईक title=

Israel-Hamas war updates:  इस्त्रायली लष्करानं सलग तिस-या दिवशी गाझा पट्टीवर बॉम्ब वर्षाव केलाय.इस्त्रायली एअरफोर्स एकामागून एक बॉम्बवर्षाव करत दहशतवादी हमासचे अड्डे उद्ध्वस्त करतंय.इस्त्रायलनं एअरस्ट्राईक केल्यानं गाझात वातावरण टाईट झालंय.  इस्त्रायली लष्करानं सलग तिस-या दिवशी गाझा पट्टीवर बॉम्ब वर्षाव केलाय.इस्त्रायली एअरफोर्स एकामागून एक बॉम्बवर्षाव करत दहशतवादी हमासचे अड्डे उद्ध्वस्त करतंय. इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी क्रूर हमासला थेट इशारा दिलाय. हमास दहशतवाद्यांना सोडू नका अशा सूचना इस्त्रायली लष्कराला देण्यात आल्यात. 

मागील 24 तासांत इस्त्रायली लष्करानं हमासवर सगळ्यात मोठा एअरस्ट्राईक केलाय. रात्रभर रॉकेट हल्ले सुरुच होते.त्यामुळे दहशतवादी हमासचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा चंगच इस्त्रायली सेनेनं बांधलाय.गाझातील वेगवेगळ्या परिसरावर एअरस्ट्राईक करत अनेक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यात.

इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक नंतरची ड्रोन दृष्य व्हायरल झाली आहेत. ड्रोन दृष्यातून हल्ला किती भयानक होता हे दिसतं आहे. डोळ्यांदेखत इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहेत. गाझापट्टीला चारही बाजूंनी इस्त्रायली लष्करानं घेरल आहे. हमास दहशतवाद्यांचा रणगाडा इस्त्रायली सैन्यानं क्षणात उद्ध्वस्त केला. इस्त्रायलवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आता इस्त्रायलनं बदला घ्यायचं ठरवलंय. त्याचेच परिणाम गाझा आणि दहशतवादी हमासला भोगावे लागतायत. गाझापट्टी बेचिराख होतेय..इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर सामान्य जनतेलाही त्याची झळ पोहचतेय...जीव वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाझातून स्थलांतराला सुरुवात झालीये.

इस्त्रायली लष्कराला गाझापट्टीला चारही बाजूंनी घेरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इंधन,अन्नपुरवठा आणि वीजसेवा खंडित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. यावरुन हेच स्पष्ट होतं इस्त्रायल आता शांत बसणार नाही.दहशतवादी हमासचा नायनाट करण्याचा चंगच आता इस्त्रायलनं बांधलाय,दिवसेंदिवस ही लढाई तीव्र होणार हे निश्चित.