मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी एखाद्या राजकुमारीसारखीच आहे. राजकुमारी या अर्थाने की सचिन तेंडुलकरची सारा ही तेवढीच लाडकी कन्या आहे. सचिन तेंडुलकर ज्या प्रमाणात मीडियापासून दूर राहत होता, तशीच सचिनची कन्या सारा तेंडुलकर मीडियापासून अंतर ठेवून आहे. कितीही अफवा आल्या तरी सचिन तेंडुलकर मीडियात सहजच त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. सारानेही आपल्या बाबाच्या पावलावर पाऊल ठेवत, अफवा पसरवणाऱ्यांची आणि अंदाज बांधणाऱ्यांची पर्वा न करता कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सचिन तेंडुकरची बॅटिंग स्टाईल पाहण्यासाठी आख्खं जग वेडं होतं. सारा तेंडुलकरचीही तशीच राहण्याची स्टाईल आहे. एखाद्या राजकुमारीसारखं तिचंही छोटंस जग आहे.
सारा तेंडुलकरचं इन्स्टा अकाऊंट डोकावल्यावर तुम्हाला हे सहज समजू शकेल. सचिनच्या कन्येला सतत भ्रमंती करायला आवडतं. सचिन देखील आपल्या कन्येसोबत सतत दिसून येतो. सचिन आणि साराचं मुलगी आणि बाबाचं नातं किती घट्ट आहे हे देखील फोटोंमधून दिसून येतं.
फोटोंमधून दिसतं की साराला आईस्क्रीम आवडते. साराचं आपला भाऊ अर्जुनवरही तेवढंच प्रेम आहे. एकदा तुम्ही साराचं इन्स्टा अकाऊंट पाहिल्यावर तुमचं हे नक्की लक्षात येईल.
सारा तेंडुलकरला इन्स्टाग्रामवर ५ लाखांपेक्षा जास्त नेटीझन्स फॉलो करतात, सारा तेंडुलकरचं इन्स्टा अकाऊंट पाहिल्यानंतर तिचं तिचा बाबा सचिन तेंडुलकरवरचं प्रेम दिसून येतं. एवढंच नाही सारा तेंडुलकरचे लहानपणीचे फोटो आणि सचिनचे तिच्यासोबतचे फोटो पाहिल्यानंतर सारा तेंडुलकर ही सचिनची सर्वात लाडकी असल्याचं स्पष्ट दिसतं.