मुंबई : काही स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चांगली आणि शांत झोप मिळत नाही. मासिक पाळीपूर्वी आणि मासिक पाळीनंतरची लक्षणं जसं की, चिंता, क्रॅम्स आणि डोकेदुखी यामुळे शांत झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. हार्मोन्समध्ये होणारे बदलही नियमित झोपेच्या चक्रात देखील व्यत्यय आणू शकतात.
मासिक पाळीच्या दिवसांत कमी झोप येणं सामान्य गोष्ट नाही. रात्री अस्वस्थेमुळे तुमचा थकवा वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे वेदना सहन करण्याची तुमची क्षमताही यामुळे कमी होऊ शकते. हा थकवा आणि वेदना पुढील दिवसाच्या सामान्य नियमित कामांमध्ये अडथळा आणू शकतात.
साधारणपणे, स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेचा त्रास होतो. दरम्यान महिलांना हा त्रास त्यांच्या मासिक पाळीत जास्त जाणवू शकतो. मासिक पाळीपूर्वीच्या हार्मोनल असंतुलनामुळे सेरोटोनिनचा स्राव कमी होऊ शकतो. हे हार्मोन शरीरातील झोपेचं चक्र नियंत्रित करतं.
प्रीमेन्स्ट्रुअल डिसफोरिक डिसऑर्डर (PMDD) ग्रस्त महिलांना झोपेच्या समस्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. NCBI च्या संशोधनातून असं दिसून आलंय की, PMDD हे मेलाटोनिन महिलांच्या प्रतिसादाशी जोडलेलं असतं. आणि हे हार्मोन आहे जो तुमच्या शरीराला झोपायला आणि जागं होण्यास प्रवृत्त करतं.
झोपेच्या अडचणी व्यतिरिक्त, मासिक पाळीची लक्षणं जसं की, क्रॅम्स आणि डोकेदुखीमुळे झोप लागणं कठीण होऊ शकते.