मुंबई : प्यूबिक हेयर म्हणजेच योनीमार्गाजवळ असलेले केस काढू टाकण्यासाठी बहुतांश महिला शेविंगचा पर्याय निवडतात. प्यूबिक हेयर तुम्हाला योनीसंदर्भातील इन्फेक्शन होण्यापासून वाचवतात. अनेकजण प्यूबिक हेअरसंदर्भात बोलत नाहीत. मात्र तुम्हाला माहितीये का? योनिमार्गाच्या रोगांपासून दूर राहायचं असेल तर प्यूबिक हेयर ट्रीम करणं गरजेचं आहे.
प्यूबिक केस ट्रिम करणे हे तुमच्या योनीमार्गाच्या स्वच्छतेसाठीच महत्त्वाचे नाही तर त्याचे अनेक फायदेही आहेत. जाणून घेऊया याचे फायदे.
योनीजवळ जास्त घाम आल्याने तो भाग गरम आणि ओला होतो. घामामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात, जे तुमच्या प्युबिक हेअरना चिकटू शकतात. नियमित वेळेनंतर शेव्हिंग न केल्याने त्याला दुर्गंधी येऊ शकते. योग्यरित्या शेव्ह केल्याने तुम्हाला बॅक्टेरिया दूर ठेवण्यास मदत होते. लक्षात ठेवा की शेव्हिंग केल्यानंतर तो भाग स्वच्छ करण्यास विसरू नका.
ट्रिमिंग तुम्हाला स्वतःला स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. योग्य पद्धतीने ट्रिमिंग केल्यास त्वचेत जळजळ होत नाही. कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील आवश्यक आहे. शेव्हिंग केल्याने तुम्हाला तेथे स्वच्छ त्वचा मिळेल.
प्युबिक शेव्हिंग केल्याने दुर्गंध आणि घाम दूर होतो आणि तुम्ही स्वतःला अधिक फ्रेश जाणवता. शिवाय तुमचा आत्मविश्वासही वाढण्यास मदत होते.