मुंबई : पार्टी, कार्यक्रम किंवा लग्न कार्यात प्रत्येक महिला काही दिवसांपूर्वीच तयारीला सुरुवात करतात. कोणता ड्रेस घालयचा. एवढंच नाही तर हेअर स्टाईलही पक्की होते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्लर. कार्यक्रमात सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक महिला पार्लरला प्राधान्य देते. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॅक्सिंग. तुम्ही पण वॅक्सिंग करत असाल, तर काही गोष्टींची काळजी नक्की घ्या...
त्वचेवर दिसत आहेत काळे डाग?
वॅक्सिंग दरम्यान स्ट्रिप लावणे आणि ओढणे यात हलगर्जीपणा होऊ शकतो. ज्यामुळे केस पूर्णपणे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे काळे किंवा लाल डाग दिसतात.
हातांच्या तुलनेत पायांची छिद्रे थोडी मोठी असतात, ज्यावर घाण सहज जमा होते. त्यामुळे पायांचे छिद्र अधिक गडद दिसतात. त्यावर मात करण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला खूप मदत करू शकतात.
स्क्रबिंग करा
चेहरा चमकदार ठेवण्यासाठी आपण कायम स्क्रबिंग करतो. त्याचप्रमाणे पायांनाही स्क्रबिंगची गरज असते. स्क्रबच्या मदतीने चेहरा तजेलदार होतो. त्याचप्रमाणे पायांनाही स्क्रबची गरज असते. त्यामुळे पायांना स्क्रब करण्यासाठी चेहऱ्यावरील स्क्रब प्रभावी ठरू शकत नाही. म्हणून पायांसाठी बाजारातून नवीन स्क्रब विकत घेऊन. पायांना स्क्रब करा.
मॉइस्चराइज आणि मालिश करा
पायांना मॉइश्चरायझिंग आणि मालिश करणे देखील महत्त्वाचे आहे. विशेषतः वॅक्सिंगनंतर भरपूर मॉइश्चरायझर लावा. पायांच्या मसाजसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल असे पर्यायही निवडू शकता. तुम्ही त्यात व्हिटॅमिन ई टाकूनही पायांची चांगली मसाज करु शकता.
रेजर करताना काळजी घ्या
जर तुम्ही वॅक्सिंगऐवजी शेव्हिंग करत असाल तर वेळोवेळी रेझर बदलणे गरजेचे आहे. पायाचं शेव करण्यापूर्वी ब्लेड नक्की बदला. ज्यामुळे शेव चांगली होईल. पण शेव केल्यानंतर मॉइस्चराइज लावायला विसरू नका.