मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला; चौघा मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू

एकाचवेळी चौघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही युवक पाण्यात बुडाले आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 14, 2023, 09:32 PM IST
मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला; चौघा मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू title=

Gadchiroli News :  समोर पाणी दिसलं आणि पोहण्याचा मोह आवरलाच नाही.  यामुळे एकाचवेळी चौघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  गडचिरोलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सर्व मृत तरुण हे एकाच गावातील राहणारे रहिवासी आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे गावालर शोककळा पसरली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे तरुण पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

मोनु त्रिलोक शर्मा (26), प्रफुल विठ्ठल येलुरे (20), शुभम रुपचंद लांजेवार (24), आणि महेश मधुकर घोंगडे ( 20 ) अशी मृत तरुणांची नावे आहेत. सर्वजण चामोर्शी येथेली कृषक हायस्कूल जवळ राहणारे आहेत. एकाच वेळा या चौघा मित्रांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

खोलगट भागात पोहण्यासाठी गेले होते

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातर्फे गडचिरोली जिल्ह्यात चिचडोह बॅरेज उभारण्यात आला आहे. या बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी हे चारही युवक गेले होते. मात्र, पाण्यात बुडून या चौघांचा मृत्यू झाला आहे. पोहण्याची इच्छा झाल्याने हे चौघेही पाण्यात  उतरले. पाणी अपेक्षेहून खोल असल्याने चारही युवक पाण्यात बुडाले. याची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि पोलीस जवानांनी स्वतःला दोर बांधून धाडसाने शोधकार्य राबवत मृतदेह बाहेर काढले. 

चामोर्शी पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठून जिवाची पर्वा न करता बोट अथवा डोंगा उपलब्ध नसल्याने स्वतःला दोरखंड बांधून खोल पाण्यात उड्या मारल्या. साधारणतः एक तास शोधमोहीम राबविल्यावर चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. स्थानिक युवकांनी पोलीसांना शोधकार्यात मदत केली.

दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह तिघांना घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील दोघांचा तर बारामती तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यांच्यावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आकाश उर्फ अक्षय संतोष खोमणे राहणार चिखली तालुका इंदापूर, ऋषिकेश नितीन सावंत रा.जाचक वस्ती लासूर्णे तालुका इंदापूर आणि सोमनाथ ज्योतीराम खुरंगे राहणार रुई पाटील तालुका बारामती जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  तिघांनाही बारामती तालुका ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.