इलेक्ट्रिक खांबाचे डायरेक्ट दोन तुकडे झाले! अंगावर काटा आणणारा अपघात

ट्रॅक्टर आणि बाईक यांची जोरदार धडक झाली. ट्रॅक्टर थेट इलेक्ट्रीक पोलवर जाऊन आदळला. यात या इलेक्ट्रीक पोलचे दोन तुकडे झाले आहे. भंडारा येथे हा भीषण अपघात घडला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 13, 2023, 05:04 PM IST
इलेक्ट्रिक खांबाचे डायरेक्ट दोन तुकडे झाले! अंगावर काटा आणणारा अपघात  title=

Bhandara Accident : भंडारा ( Bhandara) जिल्ह्यात एक विचित्र अपघात घडला आहे.  ट्रॅक्टर आणि बाईकची धडक झाल्याने हा अपघात (Accident ) घडला. हा अपघात इतका भीषण  होता की या धडकेत रस्त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रिक खांबाचे डायरेक्ट दोन तुकडे झाले आहते. अपघात घडला त्या ठिकाणी अनेक दुकाने आहेत. अपघातग्रस्त वाहने इलेक्ट्रिक खांबाला धडकली नसती तर ती थेट येथील दुकानांमध्ये  घुसली असती. मात्र, मोठी दुर्घटना टळली आहे. 

भंडारा जिल्ह्याच्या सानगडी येथून लाखांदूर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर विहीरगांव फाट्याजवळ हा अपघात घडला. एका ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. त्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. जखमी व्यक्ती हे सासरा गावचे रहिवासी आहेत. 
जखमी मंगेश गोटेफोडे (40) हे सानगडी येथील वैनगंगा कृष्णा कोकण ग्रामीण बँक येथे अस्थाई कर्मचारी म्हणून काम करतात.  तर प्रल्हाद उपरीकर (50) हे सासरा येथील शेतकरी आहेत. पुढील उपचारासाठी दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्याक आले आहे. 

हा अपघात इतका मोठा होता की वाहनांच्या धडकेत इलेक्ट्रिकचा सिमेंटचा खांब याचे दोन तुकडे झाले. चारही बाजूने तारांचा आधार असल्याने व एक दुसरा खांब आधारासाठी असल्यामुळे पुढील धोका टळला. अन्यथा अपघाताची तीव्रता अधिक मोठी असती. ट्रॅक्टर सरळ एका दुकानात घुसला असता. मात्र, मोठा धोका टळला आहे.

व-हाड्यांची बस उलटली; एक ठार 24 जण जखमी 

चंद्रपूर जिल्ह्यात व-हाड्यांची बस उलटून एक महिला ठार झाली आहे. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. यातील 24 प्रवासी जखमी तर 6 गंभीर आहेत. राजुरा येथून विवाह आटोपून वरात नांदगाव येथे परत येत असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान किन्ही गावाजवळच्या वळणावर वेगात असलेली बस नाल्यात उलटली. रात्री झालेल्या अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेले. चंद्रपूर- बल्लारपूर- कोठारी- पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी पोचत मदतकार्यात सहभाग घेतला.