Yahoo India : अमेरिकेची प्रसिद्ध टेक कंपनी याहू इंडियाने भारतातील आपल्या वृत्त सेवा बंद केल्या आहेत. कंपनीने म्हटले आहे की, नवीन मीडिया इनवेस्टमेंट नियमांमुळे भारतात बातम्या, क्रिकेट, फायनान्स, मनोरंजन आणि मेकर्स इंडियाची सेवा बंद करण्यात आल्या आहेत. परंतु युजर्ससाठी भारतात याहू ई मेल आणि सर्च सेवा सुरू राहणार आहे. भारतात डिजिटल कंटेंटचे ऑपरेशन आणि पब्लिकेशन करणाऱ्या मीडिया कंपन्यांचे परदेशी स्वामित्व मर्यादित करणाऱ्या नवीन प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (FDI)च्या नियमांमुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
नवीन FDIच्या नियमांमुळे घेतला निर्णय
अमेरिकेची टेक्नॉलॉजी कंपनी वेरिजानने 2017 मध्ये याहूचे अधिग्रहन केले. याहूने म्हटले की, 26 ऑगस्ट 2021 पासून कन्टेंट ऑपरेशन बंद करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले की, याहू क्रिकेटमध्ये बातम्यांचा देखील सामावेश आहे. त्यामुळे नवीन FDI नियामांमुळे प्रभावित झाले आहेत.
वेरिजान मीडियाचा निर्णय
डिजिटल न्यूज मीडिया आऊटलेट्समध्ये 26 टक्के जास्त विदेशी फंडिंगला मर्यादित करणाऱ्या नियमांमध्ये बदल केल्याने वेरिजान मीडियाने याहू इंडियाचे संचालन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.