सावधान, रेडमी नोट फोन पॅन्टच्या खिशात जळाला

आंध्र प्रदेशमधील गोदावरी जिल्ह्यात एका तरुणाला स्मार्टफोन खिशात ठेवणे महाग पडले आहे.  रेडमी नोट - ४ हा फोन पॅन्टच्या खिशात जळाल्याने त्याची मांडी भाजली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 16, 2017, 09:23 PM IST

हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील गोदावरी जिल्ह्यात एका तरुणाला स्मार्टफोन खिशात ठेवणे महाग पडले आहे.  रेडमी नोट - ४ हा फोन पॅन्टच्या खिशात जळाल्याने त्याची मांडी भाजली.

दरम्यान शाओमीचा 'रेडमी नोट ४' स्मार्टफोनसमोर दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच बेंगळुरुच्या एका स्टोअरमध्ये रेडमी नोट ४ या स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. 

शाओमी रेडमी नोट ४ हा स्मार्टफोन खिशात जळाल्याचे वृत्त तेलुगू वेबसाईट साक्षी डॉट कॉमने दिलेय.  तरुणाने  पॅन्टच्या खिशात हा फोन ठेवला होता. तो जळाला आणि त्यामुळे त्यांची मांडी भाजली. गोदावरी जिल्ह्यातील रवुलापलेमचा रहिवाशी असलेला हा तरुण बाईक चालवत होता. त्याचवेळी खिशात असलेल्या त्याच्या फोनला आग लागली.

हा फोन २० दिवसांपूर्वीच त्याने ऑनलाईन खरेदी केला होता. शाओमीने आपल्याला डिफेक्टिव्ह स्मार्टफोन विकला असल्याचा आरोप  त्याने केलाय. आपण याबाबत कोर्टात जाण्याची तयारी करत आहोत. शाओमीकडून तो नुकसान भरपाई मागण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरु आहे. डॅमेज झालेला स्मार्टफोन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती शाओमी कंपनीकडून देण्यात आलेय.