गूगल आणि अ‍ॅपलला ३०० हून अधिक अ‍ॅप्स हटवण्याचे आदेश !

ऑस्ट्रेलाई सिक्युरिटी एन्ड इन्वेसमेंट कमिशन च्या हस्तक्षेपानंतर गूगल आणि अ‍ॅप्पलने ३०० हून अधिक अ‍ॅप्स बंद केले आहेत.

Updated: Aug 16, 2017, 06:20 PM IST
 गूगल आणि अ‍ॅपलला ३०० हून अधिक अ‍ॅप्स हटवण्याचे आदेश !   title=

कॅनबरा : ऑस्ट्रेलाई सिक्युरिटी एन्ड इन्वेसमेंट कमिशन च्या हस्तक्षेपानंतर गूगल आणि अ‍ॅप्पलने ३०० हून अधिक अ‍ॅप्स बंद केले आहेत.

फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसार, एएसआईसी ने काही लायसन्स नसलेले काही जण अ‍ॅप्स चालवत असल्याचे आणि त्यांचे प्रमुख लक्ष्य हे बायनरी ट्रेडींग अस्ते असे निदर्शनास आले होते. 

बायनेरी ट्रेडिंगमध्ये कोणता ऑप्शन कमी वेळेत वर खाली होऊ शकतो हे पाहिले जाते. त्या अंदाजानुसार खरेदी विक्री केली जाते. पण या प्रकारामध्ये स्पेक्युलेटीव्ह ट्रेडिंगचा धोका अधिक असतो. 

अशा प्रकारचे अ‍ॅप्स वापरून तुम्ही  झटपट श्रीमंत व्हाल अशा आशा दाखवल्या जातात. ' तासाभरात 90% कमवा' अशाप्रकराच्या ऑफर्स दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. काहींकडून वैयक्तिक माहिती मागवली जाते. त्यामुळे अशाप्रकारचे अ‍ॅप्स काढून टाकण्यासाठी अ‍ॅप्पल आणि गूगला सूचना देण्यात आल्या.