मुंबई : रेडमी स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता रेडमी आणि एमआयच्या स्मार्टफोन्समध्ये नवीन फीचर वापरता येणार नाही आहे. जर तुमच्या स्मार्टफोनचं नाव यात असेल तर तुम्हाला नवीन फोन खरेदी करावा लागणार आहे.
Xiaomi ने त्याच्या फोनची यादी अपडेट केली आहे. आता सॉफ्टवेअर किंवा फर्मवेअर अपडेटसाठी सपोर्ट नाही. Redmi Note 7, Redmi K20, Redmi 7, Mi 9 SE, Mi Play सारखे स्मार्टफोन एंड-ऑफ-सपोर्ट (EOS) यादीत समाविष्ट केले गेले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, Xiaomi त्याच्या डिव्हाइसेससाठी किमान दोन वर्षांसाठी मासिक आणि त्रैमासिक सुरक्षा पॅच अपडेट पुरवते. काही प्रीमियम फोन्सना सॉफ्टवेअर अपडेट्ससाठी दीर्घ काळासाठी समर्थन मिळते.
तुमचा Xiaomi स्मार्टफोन EOS सूचीमध्ये समाविष्ट झाला आहे की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही खाली दिलेली संपूर्ण यादी तपासू शकता. जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन या यादीत सापडला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यासाठी नवीन फोन खरेदी करण्याची वेळ आली आहे.
रेडमी स्मार्टफोनची संपूर्ण लिस्ट
Redmi 1, Redmi 1S, Redmi 2, Redmi 2A, Redmi 3, Redmi 3S, Redmi 3X, Redmi 4, Redmi 4X, Redmi 4A, Redmi 5, Redmi 5 Plus, Redmi 5A, Redmi Note 1, Redmi Note 1S, Redmi Note 2, Redmi Note 2 Pro, Redmi Note 3, Redmi Note 4, Redmi Note 4X, Redmi Note 5, Redmi Note 5A, Redmi Pro, Redmi 6, Redmi 6 Pro, Redmi 6A, Redmi S2, Redmi Y2, Redmi Note 6 Pro, Redmi go, Redmi Note 7, Redmi Note 7S, Redmi Note 7 Pro, Redmi K20, Redmi 7, Redmi Y3
MI स्मार्टफोनची संपूर्ण लिस्ट
Mi 1, Mi 2, Mi 2A, Mi 3, Mi 4, Mi 4S, Mi 4c, Mi 5, Mi 5s, Mi 5s Plus, Mi 5c, Mi 5X, Mi 6, Mi 6X, Mi 8 SE, Mi Note, Mi Note 2, Mi Note 3, Mi Note Pro, MIX, MIX 2, Mi MAX, Mi MAX 2, Mi A1, Mi A2, Mi A2 Lite, Mi Pad, Mi Pad 2, Mi Pad 3, Mi Pad 4, Mi Pad 4 Plus, Mi MAX 3, Mi 8 Lite, MIX 2S, Mi MIX 2S, Mi 8 Explorer Edition, MIX 3, Mi MIX 3, Mi 8 UD, Mi 9 SE, Mi PLAY