फेसबूक अर्धातास बंद पडतं तेव्हा....

फेसबूक अनेकांसाठी किती महत्वाची वेबसाईट झाली आहे, हे आज फेसबुक अर्धातास बंद झाल्यानंतर आणखी स्पष्ट झालं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 26, 2017, 10:17 PM IST
फेसबूक अर्धातास बंद पडतं तेव्हा.... title=

मुंबई : फेसबूक अनेकांसाठी किती महत्वाची वेबसाईट झाली आहे, हे आज फेसबुक अर्धातास बंद झाल्यानंतर आणखी स्पष्ट झालं आहे. 

फेसबुक अर्धातास बंद पडल्यानंतर अनेक जण अस्वस्थ झाले, याचा संताप काढण्यासाठी अनेकांनी 'ट्विवीटरचा सहारा' घेतला,  याच वेळी फक्त फेसबुकच्या युझर्सना अडचणी येत होत्या असं नाही, तर अशीच परिस्थिती इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठीही होती, इन्स्टाग्राम आणि फेसबुक एकाच वेळेस गटांगड्या खात असताना दिसले.

भारतासह जगभरातील युझर्सला या अडचणीचा सामना करावा लागला. मात्र या अडचणी वेगवेगळ्या स्वरूपात येत होत्या, काहींचं अकाऊंट जे डेस्कटॉपवर सुरू होतं नव्हतं, ते फेसबुक अकाऊंट मोबाईलवर दिसत होतं.

भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासह अनेक देशांमध्ये फेसबुक युझर्सला या अडचणीचा सामना करावा लागला. अनेक युझर्स या अर्ध्या तासामध्ये लॉग-ईनही करु शकले नाही. तर अनेकांना लॉग आऊट करण्यासाठी अडचण आली. 

इंस्टाग्रामवर अनेक युझर्सने प्रयत्न करुनही फोटो अपलोड होत नव्हते. या दरम्यान फेसबुकने काही तांत्रिक काम सुरू असल्याचंही म्हटलं आहे.