WhatsApp : तुमच्या नकळत कोण वाचतोय व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स?

व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) पाठवण्यात आलेले मेसेजेस हे एंड टू एंड एनक्रिप्टेड (End to end encrypted Messaging) असतात.

Updated: Nov 4, 2022, 08:35 PM IST
WhatsApp : तुमच्या नकळत कोण वाचतोय व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स? title=

Tech News : व्हॉट्सअ‍ॅपचा (Whtsapp) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आलेले मेसेजेस हे एंड टू एंड एनक्रिप्टेड (End to end encrypted Messaging) असतात. अनेकदा आपल्या नकळत काही जण व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स (Whtsapp Chats) वाचतात. जर तुम्हाला वाटत असेल की कुणी तुमचे व्हॉट्सअ‍ॅपच चॅट्स चोरुन वाचतंय तर त्याचा एका झटक्यात छडा लावू शकता. (whatsapp tricks how to know someone use your whatsapp account) 

व्हॉट्सअ‍ॅपवर एक फीचर लिंड डिव्हाइस देण्यात आलं आहे. याद्वारे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकता. या मदतीने दुसरी कुणीही व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा एक्सेस घेऊ शकतो. 

पण तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपसोबत कोण गेम करतंय हे जाणून घेण्याची कंपनी मुभा देते. यासाठी आधी मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावं लागेल. व्हॉट्सअ‍ॅप ओपन झाल्यावर डाव्या कोपऱ्यात 3 ठिपक्यांवर क्लिक करा. यानंतर लिंक्ड डिव्हाइस (Linked Device) या ऑप्शनवर जा. 

असं जाणून घ्या

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप आणखी कुठे सुरु आहे याची माहिती तुम्हाला इथे मिळेल. जर तुम्हाला इथे माहितीबाहेरील डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन असेल तर ताबडतोब रिमूव्ह करा.

यामुळे जर तुमच्या नकळत कुणी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन केलं असेल तर आपोआप लॉगआउट होईल. दरम्यान तुमच्या मोबाईलला टच केल्याशिवाय दुसऱ्या डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन करता येत नाही. 

यासाठी मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन क्यूआर कोड (Qr Code)स्कॅन करावं लागतं.  तुमचं व्हॉट्सअ‍ॅप आणखी सेफ करण्यासाठी टु स्टेप वेरिफिकेशन सेटअप करु शकता.  याशिवाय तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपला पासवर्ड ठेऊ शकता. यामुळे जर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचं एक्सेस जरी मिळालं तरी ती व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप ओपन करु शकत नाही.