WhatsApp चे डिलिटेड मॅसेज पुन्हा मिळवण्यासाठी या सोप्या ट्रिक्स वापरा

आजकाल आपण सर्वचजण व्हाट्सअप मॅसेजिंग ऍप वापरत असतो. व्हाट्सअपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नवीन फीचर्स अपडेट झाले आहेत

Updated: Nov 13, 2021, 09:37 AM IST
WhatsApp चे डिलिटेड मॅसेज पुन्हा मिळवण्यासाठी या सोप्या ट्रिक्स वापरा title=

मुंबई : आजकाल आपण सर्वचजण व्हाट्सअप मॅसेजिंग ऍप वापरत असतो. व्हाट्सअपमध्ये (WhatsApp) गेल्या काही महिन्यांपासून नवीन फीचर्स अपडेट झाले आहेत. जर तुमचे महत्वाचे मॅसेज-चॅट डिलिट झाले तर ते तुम्हाला परत मिळवता येतात. 

डिलिट केलेले मॅसेज करा रिकवर
जर तुम्हाला चुकून किंवा इतर कोणत्याही कारमामुळे डिलिट झालेले मॅसेज पुन्हा मिळवायचे असतील तर, व्हाट्सअप आणि चॅट बॅकअप हा पर्याय उपलब्ध असतो. ज्यामाध्यमातून व्हाट्सअप क्लाऊडमद्ये बॅकअप होत राहिल.

ऍंड्रॉइड स्मार्टफोन्सवर दररोज रात्री 2 ते 4 दरम्यान बॅकअप होत असतो. जर तुमचा फोन हरवला किंवा बिघाड झाला तर तुमचे मॅसेज चॅट डिलिट होतात. त्यामुळे नवीन फोनमध्ये तुम्ही व्हाट्सअप बॅकअपच्या माध्यमातून मॅसेज रिकवर करू शकतात.

असे करा मॅसेज रिकवर
ऍंड्रॉइड स्मार्टफोन फाइल मॅनेजरमध्ये जा, त्यात ऍंड्रॉइड फोल्डर ओपन करा. त्यामध्ये व्हाट्सअप फोल्डर ओपन करा. पुढे डेटाबेस सिलेक्ट करा आणि त्यामध्ये डेटाबेसच्या फोल्डरमध्ये जा. 

येथे जुन्या बॅकअपच्या फोल्डरचे नाव बदला जसे की, 'msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt12' हे बदलून 'msgstore.db.crypt12'करा. यापद्धतीने शेवटच्या बॅकअपपर्यंत मॅसेज व्हाट्सअपवर रिस्टोअर होतील.

या प्रकारे सोप्या ट्रिक्सच्या माध्यमातून व्हाट्अपवर मॅसेजवर रिकवर किंवा रिट्रिव करू शकते.