या कारने जिंकला 'जगातील सर्वात सुंदर कार'चा किताब, भारतीय बाजारपेठेत इतकी आहे किंमत

जर्मनीतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Audi India ने काही काळापूर्वी ऑडी ई-ट्रॉन जीटी (Audi e-tron GT) भारतात लॉन्च केली.

Updated: Nov 12, 2021, 10:07 PM IST
या कारने जिंकला 'जगातील सर्वात सुंदर कार'चा किताब, भारतीय बाजारपेठेत इतकी आहे किंमत title=

मुंबई : जर्मनीतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Audi India ने काही काळापूर्वी ऑडी ई-ट्रॉन जीटी (Audi e-tron GT) भारतात लॉन्च केली. भारतीय बाजारात या कारची सुरुवातीची किंमत 1.79 कोटी रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली होती. या लक्झरी कारमध्ये अनेक उत्तम फिचर्स आहेत. याशिवाय, सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोकांना त्याचा लुक खूप आवडतो. या कारला 2021 च्या 2021 Goldenes Lenkrad awards   (Golden Steering Wheel) मध्ये '2021 ची जगातील सर्वात सुंदर कार' म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

भारतीय बाजारपेठेत ऑडी ई-ट्रॉन जीटी इलेक्ट्रिक कारचे दोन प्रकार आहेत. Audi e-tron GT Quattro आणि Audi RS e-tron GT या नावाने प्रसिद्ध असलेल्या, दोन्ही कारची बॅटरी रेंज सिंगल चार्जवर 488 किमी आहे. या दोघांचा सर्वाधिक वेग 245 किमी प्रतितास आहे.

ऑडी ई-ट्रॉन जीटी ही चार दरवाजांची सेडान आहे जी भारतातील जर्मन ब्रँडच्या इलेक्ट्रिक वाहन लाइनअपमध्ये सामील झाली आहे. या दोन्ही ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ई-ट्रॉन जीटी मॉडेल्सचे डिझाइन अतिशय खास बनवण्यात आले आहे, ज्याला स्पोर्टी लुक देण्यात आला आहे. बॉडीचा लूक पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, त्याचे बोनेट, फ्रंट बंपर किती अप्रतिम आहे.

ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ई-ट्रॉन जीटी मध्ये 93 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आले आहेत. RS e-tron GT ला 590 bhp पॉवर आणि 830 Nm टॉर्क मिळतो. ही ऑडी कार 4.1 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग पकडते. इलेक्ट्रिक सेडानमध्ये एका पूर्ण चार्जवर 388 किमी ते 500 किमीची WLTP ड्रायव्हिंग रेंज आहे. वेगाच्या बाबतीत, ई-ट्रॉन जीटी केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.ई-ट्रॉन GT ला 469 bhp पॉवर आणि 630 Nm टॉर्क मिळतो.