येत्या वर्षात या स्मार्टफोनमधून गायब होणार 'व्हॉटसअप'

हे फोन तुम्ही वापरत असाल तर लवकरच हे फोन बदला... 

Updated: May 15, 2019, 10:07 AM IST
येत्या वर्षात या स्मार्टफोनमधून गायब होणार 'व्हॉटसअप'  title=

मुंबई : इन्स्टंट मॅसेजिंग एप्लिकेशन 'व्हॉटसअप' स्मार्टफोन युझर्समध्ये भलतंच लोकप्रिय आहे. या एप्लिकेशनचे वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. अशावेळी 'व्हॉटसअप'नं आपण काही मोबाईलवरून व्हॉटसअप सुविधा हटवणार असल्याचं जाहीर केलंय. येत्या ३१ डिसेंबर २०१९ नंतर काही मोबाईलवर व्हॉटसअप वापरता येणं बंद होणार आहे. व्हॉटसअपच्या माहितीनुसार, येत्या वर्षात अनेक जुन्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट हटवण्यात येईल. त्यामुळे एन्ड्रॉईड, आयओएस आणि विंडोजचे जुने ऑपरेटिंग सिस्टम असलेले फोन तुम्ही वापरत असाल तर लवकरच हे फोन बदला... 

३१ डिसेंबर २०१९ नंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉटसअप बंद करण्यात येणार आहे. याशिवाय एन्ड्रॉईड व्हर्जन २.३.७ (जिंजरब्रेड) किंवा त्याहून जुन्या व्हर्जनवर व्हॉटसअप बंद होईल. आयफोनच्या आयओएएस ७ व्हर्जनवरही १ फेब्रुवारी २०२० रोजी व्हॉटसअप काम करणं बंद करणार आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०१७ नंतर ब्लॅकबेरी OS, ब्लॅकबेरी १०, विंडोज फोन 8.0, नोकिया एस ४०, नोकिया सिम्बियन एस ६०, आयफोन आयओएस ६, आयफोन ३GS आणि इतर जुन्या प्लॅटफॉर्मसाठी व्हॉटसअप बंद करण्यात आलंय. 

'व्हॉटसअप' शॉपिंग

आनंदाची गोष्ट म्हणजे, 'व्हॉटसअप'मध्ये यापुढे तुम्हाला चॅटिंगसोबतच शॉपिंगही करता येणं शक्य होणार आहे. यासाठी कंपनीनं व्हॉटसअप बिझनेससाठी प्रोडक्ट कॅटलॉगही तयार केलंय. यामध्ये ग्राहकांना चॅटमध्येच वस्तूंची यादीही दिसेल. या यादितील वस्तू निवडून ग्राहक ते खरेदीही करू शकतील.