Whatsapp scam : तुम्ही WhatsApp वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. दरम्यान व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय अॅप्सपैकी एक आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे सायबर गुन्हेगारही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. व्हॉट्सअॅपशी संबंधित घोटाळे वेळोवेळी समोर येत असतात. आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा त्या लोकांना लक्ष्य करत आहे जे त्याचे पर्यायी अॅप वापरत आहेत. (whatsapp scam clone whatsapp stealing your data)
व्हॉट्सअॅपचे अनेक पर्यायी अॅप्स उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅपचे पर्यायी अॅप्स अनेकजण डाऊनलोड करतात कारण त्यामध्ये जास्त फीचर्स असतात. पण या पर्यायी अॅप्समुळे तुमचा डेटा आणि गोपनीयता दोन्ही धोक्यात आली आहे.
YoWhatsApp वरून हा धोका
सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट kaspersky च्या (Cyber security expert Kaspersky) रिपोर्टनुसार असे अॅप्स युजर्सचा डेटा चोरत आहेत. या अहवालानुसार, YoWhatsApp च्या 2.22.11.75 वर्जन मध्ये एक मालवेअर आढळून आला आहे जो वापरकर्त्यांच्या उपकरणांमध्ये मालवेअर सक्रिय करतो आणि नंतर तुमचे तपशील चोरण्यास सुरुवात करतो. याच्या मदतीने सायबर गुन्हेगार कुठेही बसून तुमचे खाते वापरू शकतात.
व्हॉट्सअॅपची MODDED वर्जन धोकादायक
व्हॉट्सअॅपची अशीच एक डुप्लिकेट वर्जन YoWhatsApp आहे. यामध्येही यूजर्सना मूळ व्हॉट्सअॅपपेक्षा जास्त फीचर्स मिळतात. त्यामुळे याचा वापर करणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे. जेव्हा हे अॅप तुमच्या फोनवर इंस्टॉल (Install) कराल तेव्हा तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण ठेवते. Triada Trojan आणि इतर अनेक मालवेअरही या अॅपमध्ये सापडले आहेत. हे मालवेअर तुमच्या माहितीशिवाय अनेक सशुल्क सब्सक्रिप्शनने सुरू करतात.
GB WhatsApp ही डेटा चोरत आहे
याशिवाय अलीकडेच सायबर सुरक्षा फर्म ESET ने देखील एक अहवाल जारी केला आहे. त्यामध्ये व्हॉट्सअॅपचे क्लोन असलेले थर्ड पार्टी अनऑफिशियल अॅप जीबी व्हॉट्सअॅप देखील भारतीय वापरकर्त्यांचा डेटा चोरत असल्याचे सांगण्यात आले. भारतातही याचे अनेक वापरकर्ते आहेत. हे आणि इतर डुप्लिकेट WhatsApp अॅप्स थर्ड पार्टी अॅप्सद्वारे किंवा APK फाइल्सद्वारे स्थापित केले जातात.