WhatsApp चं भन्नाट नवीन फीचर; स्टेटसवर लवकरच video लिंक करता येणार

WhatsApp Rich Link Previews Feature:रिच लिंक प्रिव्ह्यू वैशिष्ट्य सेंडर आणि रिसीवर दोघांसाठी उपयुक्त ठरेल. स्टेटसमधील लिंक टाकताच, ती ओपन करून वाचण्यापूर्वीच त्याला त्या लिंकमध्ये काय आहे ते कळेल.

Updated: May 16, 2022, 07:03 PM IST
WhatsApp चं भन्नाट नवीन फीचर; स्टेटसवर लवकरच video लिंक करता येणार title=

मुंबई : WhatsApp Rich Link Previews Feature:WhatsApp सध्या नवीन फीचरवर काम करत आहे. नवीन फीचर यूजर्सला विशेष अनुभव देणार आहे. WhatsApp स्टेटसवर लिंक शेअर करण्यासाठी कंपनी लवकरच रिच लिंक प्रिव्ह्यू फीचर जनरेट करणार आहे. रिच लिंक प्रिव्ह्यू फीचर सेंडर आणि रिसीवर दोघांसाठी उपयुक्त ठरेल. स्टेटसमध्ये लिंक टाकताच, ती ओपन करून वाचण्यापूर्वीच त्याला त्या लिंकमध्ये काय आहे ते कळेल.

सध्या युजर्सकडे स्टेटसवर व्हिडिओ लिंक अपलोड करण्याचा पर्याय नाही. उदाहरणार्थ, वापरकर्त्यांना YouTube किंवा Reels लिंक शेअर करणे थोडे कठीण आहे. मात्र लवकरच प्रीव्ह्यूचा पर्याय लिंकसोबत उपलब्ध होणार आहे. अशा परिस्थितीत WhatsApp स्टेटस खूप मजेदार असणार आहे.

रिच लिंक प्रीव्ह्यू फीचर डेव्हलपमेंटची चाचणी सुरू आहे. अलीकडेच, व्हॉट्सअॅपने मेसेज रिअॅक्शन फीचर आणले आहे, ज्यामध्ये यूजर मेसेज होल्ड करून इमोजीद्वारे प्रतिक्रिया देऊ शकतात.

या वैशिष्ट्याचा वापर करून चॅट अधिक मनोरंजक बनवता येऊ शकतात. याशिवाय 2GB फाईल शेअरिंगसारख्या इतर अनेक फीचर्स प्लॅटफॉर्मवर येऊ शकतात.