मुंबई : आता डिजिटल आणि ऑनलाईन App, सेवा सुविधांचा वापर वाढत आहे. त्यामुळे आयुष्य खूप सोपं झालं आहे. जेवणा-खाण्यापासून ते पैसे देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी एका क्लीकवर होत आहेत. आपल्या आरोग्यासाठीही काही अॅप आहेत. ज्यावर तुम्ही आपलं आरोग्य, आहार ट्रॅक करून शकता. डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
मासिकपाळीसाठी आधीच काही अॅप आहेत. मात्र ती थर्ड पार्टी अॅप आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ती वापरण्यात धोकाही असतो. आता Whatsapp मुळे ही समस्या देखील संपणार आहे. कारण Whatsapp ने मासिक पाळीच्या तारखा लक्षात ठेवण्यासाठी खास फीचर लाँच केलं आहे.
Whatsapp वर मासिक पाळीच्या तारखा ट्रॅक करता येणार आहे. हे फीचर भारतात पहिल्यांदाच लाँच करण्यात आलं आहे. कंपनीने Whatsapp नंबर दिला आहे. 9718866644 या क्रमांकावर सिरोना Whatsapp बिझनेस अकाऊंटवर HI पाठवायचं आहे.
तुम्ही हाय पाठवल्यावर तुम्हाला तुमचे डिटेल्स कळवायचे आहेत. त्यानंतर तुमच्या मासिक पाळीच्या तारखा ट्रॅक करण्यासाठी हे फीचर मदत करणार आहे. महिलांच्या संपूर्ण सायकलवर या अॅपचं लक्ष असणार आहे.
मासिक पाळीचे डिटेल्स तुम्हाला सांगायचे आहेत. चॅटबॉट तुमचे सगळे रेकॉर्ड ठेवणार आहे. गरज आणि मागणीनुसार तुम्हाला मासिक पाळीच्या तारखाही Whatsapp वर शेअर केल्या जाणार आहेत.
सिरोना तुम्हाला तुमच्या व्यूलेशन डिटेल, फर्टाइल विंडो, नेक्स्ट पीरियड आणि लास्ट पीरियड डेट याबद्दल माहिती देईल. इतकंच नाही तर तुमची पाळी किती दिवस असेल याबद्दलही माहिती देणार आहे.