व्हाट्सअॅपच्या सह-संस्थापकाची फेसबुकला सोडचिठ्ठी

फेसबुकवर पोस्ट लिहून कॉमनी शेअर केला निर्णय

Updated: May 1, 2018, 03:20 PM IST
व्हाट्सअॅपच्या सह-संस्थापकाची फेसबुकला सोडचिठ्ठी title=

सॅन फ्रान्सिस्को : समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) वापरले जाणारे सध्याचे सर्वात लोकप्रिय अॅप म्हणजे व्हाट्सअॅप होय. याच व्हाट्सअॅपचे सह-संस्थापक जेन कॉम यांनी फेसबुकला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहून आपला निर्णय सांगताना जेन यांनी म्हटले आहे की, मला स्वत:ला वेळ द्यायचा आहे. त्यासाठी आपण पद सोडत आहोत.

फेसबुकवर पोस्ट लिहून शेअर केला निर्णय

अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार फेसबुक, व्हाट्सअॅपच्या माध्यमातून यूजर्सच्या लिक झालेल्या डेटावरून त्यांचे फेसबुकसोबत काही मतभेद झाले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, जेन कॉम यांनी फेसबुकर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'सुमारे १० वर्षांपूर्वी ब्रायन एक्टन यांच्यासोबत मी व्हाट्सअॅपची सुरूवात केली. काही चांगल्या लोकांसोबतचा प्रवास चांगला राहिला. मात्र, आता वेळ आली आहे याहीपेक्षा पुढचे पाऊल टाकण्याची.' उल्लेखनीय असे की, ब्रायन यांनी गेल्याच वर्षी फेसबुक सोडले होते.

जेन कॉम यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, 'मी अशा वेळी कंपनी सोडत आहे की, ज्या वेळी लोक माझ्या कल्पनेपेक्षाही मोठ्या प्रमाणात व्हाट्सअॅप वापरू लागले आहेत. आज व्हाट्सअॅपची टीम ही पहिल्यापेक्षाही अधिक मोठी आणि सक्षम आहे. आयुष्यातील काही काळ मी तंत्रज्ञानापासून दूर राहू इच्छितो. या काळात मी माझ्या कारने प्रवास करेन. तसेच, खेळही खेळेण. माझा जीवनप्रवास सुंदर केल्याबद्धल धन्यवाद!'

झुकरबर्गने दिला प्रातिसाद

जेन कॉमच्या पोस्टला उत्तर देताना फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने म्हटले आहे की, मला जेन कॉमची कमी जाणवेन. जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी आपण जे केलेत तसेच, आपल्याकडून मला जे शिकायला मिळाले त्याबाबत धन्यवाद.