मुंबई : डेबिट/ एटीएम कार्ड बँकेत सेव्हिंग खाते उघडल्यानंतर आपण घेत असतो. एटीएम कार्डच्या मदतीने आपण रोख रक्कम काढणे, बॅलन्स चेक किंवा डिजिटल पेमेंट करणे यासारख्या गोष्टी करतो. हल्ली एटीएम आवश्यक झालं आहे, सायबर हल्ल्याच्या वाढत्या घटनेत एटीएम गमावणे किंवा चोरी जाणे आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरु शकतं. मात्र आता आपले डेबिट कार्ड हरवल्यास, आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण आपले एटीएम हरवल्यास क्षणाचाही विलंब न करता काही पावले उचलण्याची गरज आहे.
जर आपले एटीएट कार्ड गमावले किंवा चोरी गेले असेल तर तात्काळ हे पाऊल उचला. जर आपले एटीएट चोरी गेले असेल तर त्वरित आपल्या बँकेला कळवा. एखाद्या बँकेच्या शाखेत जाऊन तिथे अर्ज देऊन आपले खाते ब्लाँक करा. किंवा तत्काळ इंटरनेट बँकिंग व्दारे आपले खाते ब्लाँक करु शकता.
आपले डेबिट / एटीएम कार्ड हरवले किंवा चोरी झाले आहे, हे समजताच त्वरित आपल्या बँकेत नोंदवा. बँकेला माहिती देण्याचे अनेकमार्ग आहेत. हे काम एखाद्या बँकेच्या शाखेत जाऊन किंवा बँकेच्या मोबाइल एसेमेस व्दारेही देऊ शकता.
आपण वेळेवर कार्ड हरवल्याची तक्रार बँकेत न दिल्यास आपले मोठे नुकसान होऊ शकते. त्यानंतर बँक आपल्या बचत खात्यावरील चोरी गेलेल्या रक्कमेची कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. वेळेतच, जर कार्ड हरवल्याची माहिती बँकेला दिली गेली, तर बँक कायदेशीरपणे कार्ड ब्लॉक करण्यास मदत करेल.
जर तुमचे एटीएम कार्ड हरवले नसून चोरी झाले आहे. असे आपल्याला वाटत असल्यास त्याबद्दल एफआयआर देखील दाखल करु शकता. एटीएट कार्ड चोरी गेल्याची तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये नोंदविला जाऊ, शकते.
ज्यासाठी तुम्हाला एटीएम कार्डची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. एफआयआर नोंदविल्यानंतर त्याची एक प्रत तुम्हाला दिली जाईल. ही प्रत भविष्यातील वापरासाठी खूप म्हत्वाची ठरु शकेल.
जुने एटीएम किंवा डेबिट कार्ड हरवल्यानंतर आपण नवीन कार्डसाठी अर्ज करू शकता. हे इंटरनेट बँकिंगद्वारे देखील करता येते. त्याच वेळी, जे लोक इंटरनेट बँकिंग वापरू शकत नाहीत ते बँक शाखेत जाऊन नवीन कार्डसाठी अर्ज करू शकतात. गमावलेल्या डेबिट कार्डाच्या बदल्यात बँका नवीन कार्ड देण्यासाठी काही फी आकारु शकते.