मुंबई : Google दरवर्षी एक अहवाल शेअर करतो. यामध्ये तो नेहमी हे सांगत असतो की, लोक सर्वात जास्त गुगलवर काय सर्च करतात. ज्यामुळे ही माहिती अनेक ऍड कंपनी आणि इतर रिचर्स कंपनीच्या कामाला येते. या माहिची वेगवेगळ्या वर्गात विभागणी केली जाते. जसे की वय, लिंग, विषय इत्यादी. त्यात आता एक नवीन अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये विवाहित महिलांबद्दल गुगलने एक रिपोर्ट जारी केला आहे. ज्याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.
गुगलच्या नवीन डेटावरून असे दिसून आले आहे की, विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीबद्दल बहुतेक गोष्टी शोधतात. यामध्ये सर्वात सामान्य प्रश्न हा आहे की पतीला आनंदी कसे ठेवायचे? ही बातमी अनेकांना आश्चर्याची वाटत असली तरी विवाहित महिलांचा सर्वात आवडता विषय हा पतीबद्दलच असतो. त्यामुळे त्या त्याच्याच संदर्भात काहीतरी शोधत असतात.
तसेच, पतीला मुठीत कसे ठेवायचे हे विवाहित महिलांना जाणून घ्यायचे असते, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. यासोबतच महिलांनी गुगलला सासरच्या घरात कसं वागावं हेही सर्च केलं आहे.
तसेच ती तिच्या पतीसोबतचे नाते कसे सुधारू शकते? हे देखील सर्च करते.
गुगलवरील सर्च लिस्टने सर्वांना आश्चर्यचकित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असेच अहवाल समोर आले आहेत.
महिलांनीही गुगलला मुलाच्या जन्माबाबत देखील प्रश्न केला आहे.
याशिवाय विवाहित महिलाही मूल होण्याबाबत प्रश्न विचारतात. स्त्रियांना हे जाणून घ्यायचे असते की, त्यांना लग्नानंतर मूल कधी व्हावे. गुगलला मुलाची आणि कुटुंबाची जबाबदारी घेण्याचा योग्य मार्ग देखील विचारला जातो.
आता महिलांनाही स्वावलंबी व्हायचे आहे. म्हणूनच ती स्वावलंबी होण्याच्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पनेबद्दल गुगला विचारते.