नवी दिल्ली : ऑनलाईन बाजारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी चायनीज मोबाईल कंपनी वीवोने भारतात आपले ई-स्टोर सुरू केले आहे. त्यामुळे देशभरात वीवो चे उत्पन्न आणि सेवेचा लाभ सर्वांना घेता येईल.
वीवो इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी केनी जेंग यांनी सांगितले की, नवीन ई-स्टोरसोबत वीवो स्मार्टफोनच्या नवीन श्रेणी विशेष लॉन्च ऑफर्स देशातील युजर्सना उपलब्ध होतील. कंपनीने सांगितले की, वीवोच्या नव्या सिरीजचे स्मार्टफोन्स देशातील १०,००० डाक सेवेतील क्षेत्रात उपलब्ध होतील.
लॉन्च कार्निवलच्या अंतर्गत स्मार्टफोन्सवर १६-१८ जानेवारीपर्यंत विशेष सुट देण्यात येणार असल्याची घोषणा हॅंडसेट निर्मात्यांनी केली आहे. या दरम्यान ग्राहक खरेदी करू इच्छिणाऱ्या स्मार्टफोन्सवर २००० पर्यंत डिस्काऊंट मिळेल. त्याचबरोबर कंपनी ई-स्टोर अॅप्लिकेशन लॉन्च करण्याची योजना करत आहे. त्यात लाईव्ह चॅटचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करताना मदत होईल.
यापूर्वीही नवीन वर्षात कंपनीने वीवो V7 ची किंमत कमी केली होती. बाजारात १८,९९० रूपयांना हा फोन लॉन्च करण्यात आला होता. मात्र न्यू ईअर ऑफरमध्ये याची किंमत १६,९९० रुपये करण्यात आली होती. हे डिस्काऊंट ऑनलाईन सोबत ऑफलाईन स्टोर्सवर देखील उपलब्ध आहे. या फोनची खासियत म्हणजे याचा कॅमेरा. V7 मध्ये 24MP चा सेल्फी कॅमेरा आहे. यात पोट्रेट मोड आहे. त्याच बरोबर सेल्फी कॅमेऱ्यात LED फ्लॅश देखील देण्यात आले आहे. त्यामुळे कमी प्रकाशातही फोटोज अतिशय उत्तम येतात. फोनमध्ये 16MP चा रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये फेस अनलॉक फीचर देखील उपलब्ध आहे.