USBचा वापर करता? तर मग व्हा सावधान

तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपला यूएसबी कनेक्ट करता? तर मग ही बातमी नक्की वाचा. नाही तर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 16, 2017, 11:24 PM IST
USBचा वापर करता? तर मग व्हा सावधान title=

मेलबर्न : तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपला यूएसबी कनेक्ट करता? तर मग ही बातमी नक्की वाचा. नाही तर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. 

कम्युटरला इतर उपकरणांशी जोडण्याकरीता जगभरात यूएसबी सारख्या वस्तुंचा वापर करण्यात येतो. मात्र, हेच यूएसबी वापरणं सर्वाधिक असुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.

एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे की, ऑस्ट्रेलियातील ऑफ एडिलेड विद्यापीठाच्या संशोधकांनी ५० वेगवेगळ्या कंम्प्यूटर आणि एक्सटर्नल यूएसबी हब्सचं निरीक्षण केलं. या निरीक्षणात समजलं की, ९० टक्के माहिती ही लीक होऊन ती एक्सटर्नल यूएसबी उपकरणात आली. 

या अभ्यासाचे असोसिएट युवल यारोम यांनी सांगितले की, "यूएसबीशी संबंधित उपकरणांमध्ये किबोर्ड, कार्डस्वाइपर आणि फिंगरप्रिंटर रीडर्सचा समावेश आहे आणि हे नेहमी कम्यूटरला संवेदनशील सूचना पाठवतात. 

म्हणजेच पासवर्ड किंवा इतर माहिती दर्शविणारे कीस्ट्रोक्स सहजरीत्या चोरी केले जाऊ शकतात. यूएसबी कनेक्शनला अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यांना पून्हा डिझाईन करणं गरजेचं असल्याचंही यारोम यांनी म्हटलं आहे.