या प्रसिद्ध कंपनीनं गुंडाळलं भारतातील बस्तान, परदेशातून Import करावी लागणार कार

या कंपनीची कार खरेदी करणं होणार महाग, कंपनीचा मोठा निर्णय

Updated: Sep 9, 2021, 07:47 PM IST
या प्रसिद्ध कंपनीनं गुंडाळलं भारतातील बस्तान, परदेशातून Import करावी लागणार कार title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली: गाडी घेण्याचं स्वप्न असणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. प्रसिद्ध कंपनीनं आपलं बस्तान भारतातून गुंडाळलं असून या कंपनीच्या गाड्या आता खरेदी करणं चांगलंच महाग पडणार आहे. प्रसिद्ध कंपनी फोर्डने भारतातील आपलं बस्तान बंद केलं आहे. त्यामुळे ही कार घेण्याचं तुमचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं किंवा महाग होऊ शकतं असं सांगितलं जाच आहे. 

दिग्गज अमेरिकेची ऑटोमोबाईल कंपनी फोर्डने भारतातील  मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला जर या कंपनीची गाडी घ्यायची असेल किंवा त्याचे पार्ट्स मागवायचे असतील तर आता तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागू शकते. कारण ही गाडी आता तुम्हाला परदेशातून मागवावी लागणार आहे. या कंपनीचे पार्ट्स भारतात मिळणार की नाही याबाबत सध्या कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. 

भारतीय बाजारपेठेत बऱ्याच काळापासून आर्थिक संकटात सापडलेल्या फोर्ड कंपनीला इको स्पोर्ट्स लाँच झाल्यावर चालना मिळाली. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कंपनीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. वाहनांच्या विक्रीतही मोठी घट झाली.

या सगळ्यामुळे कंपनीला सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. याच कारणामुळे फोर्ड मोटरने आता चेन्नई आणि तामिळनाडू मधील आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ असा की कंपनी या प्लांट्सपासून बनवलेल्या इकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर सारख्या वाहनांची विक्री बंद करणार आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रात भारतातील प्रसिद्ध कंपनी महिंद्र अॅण्ड महिंद्रासोबत असलेली भागीदारी संपल्यानंतर फोर्ड कंपनीने कारचे कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्ड मोटर कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यासंदर्भात कंपनीकडून अधिककृत घोषणा लवकरच करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. 

फोर्डच्या आधी, जनरल मोटर्स आणि हार्ले-डेव्हिडसन सारख्या दिग्गज अमेरिकन ऑटोमोबाईल कंपन्यांनीही भारतातून आपला व्यवसाय गुंडाळला आहे. फोर्ड कंपनी आपल्या काही कार आयत करून देशात विकत राहील. अशा परिस्थितीत ज्यांना फोर्ड कार घ्यायची आहे त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील, पण त्यांना कारची डिलिव्हरी भारतात मिळेल असंही सांगण्यात आलं आहे. शिवाय याचे पार्ट्स भारतात मिळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.