मुंबई : तुम्ही स्मार्टफोनचा वापर करुन काही खरेदी विक्री करत असाल तर वेळीच सावधान व्हा.
कारण 'जैफेकॉपी ट्रोजन' नावाचा एक व्हायरस सुमारे ४०% भारतीयांचे नुकसान करत आहे. भारतासह जगभरात या व्हायरसची दहशत वाढत आहे.
जगभरात सुमारे ४७ देशांमध्ये स्मार्टफोन युजर्सच्या फोनवर हल्ला करून त्यांच्या बॅंक डिटेल्सचे नुकसान होत आहे. ही माहिती सायबर सिक्युरिटी फर्म कास्पर्स्की ने दिली आहे. तुमच्या मोबाईलमध्ये या व्हायरसचा शिरकाव झाला तरीही तुमचा फोन सामान्यपणेच काम करतो. परिणामी हा धोका थेट कळून येत नाही.
वायरलेस अॅप्लिकेशन प्रोटोकॉल (वैप) या बिलिंग प्लॅटफॉर्मद्वारा व्हायरस मोबाईलमध्ये प्रवेश करतो. वैप ही एक मोबाईल पेमेंट सिस्टम आहे. याद्वारा तुमचा खर्च थेट मोबाईल बिलामध्ये जोडला जातो. सार्या सिक्यॉरिटी फीचरला मात देत हा व्हायारस अनेक सर्विसला सबस्क्राईब करतो. याचा थांगपत्ता ग्राहकांना न लागू देता थेट पेमेंटही केले जाते. डेबिट आणि क्रेडीट कार्डचेही सबस्क्रिप्शन घेऊन पैसे उडण्याचा धोका आहे.
काही अंक आणि अक्षर मिळून कॅप्चा सिस्टिम बनवली जाते. त्याचा वापर करून विशिष्ट काम माणूसच करत आहे. याची खात्री केली जाते. पण या यंत्रणेलादेखील हा व्हायरस अगदी सहज भेदून पुढे जातो. म्हणूनच या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करू नका. तसेच मोबाईलमध्ये अॅन्टी व्हायरस आणि इतर सिक्युरिटी मेसेजवर विशेष लक्ष द्या.