मुंबई : Smartphone News : स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता आणि त्यावर आपले राहणे, ही काळाजी गरज झाली आहे. असे असले तरी तुमचा स्मार्टफोन कधी हॅक होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी सावधान असले पाहिजे. फोन हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांसाठी अत्यंत असुरक्षित झाले आहेत. APP Download करतना हॅकर्स यूजर्सला माहिती न देता Google Play Store किंवा App Store मधील लिंक्स किंवा अॅप्सद्वारे iPhone किंवा Android फोनमध्ये धोकादायक मालवेअर टाकून त्यांना टार्गेट करतात. हे व्हायरस ऑपरेटिंग सिस्टीमच्या असुरक्षित भागांवर हल्ला करतात आणि बँकिंग तपशिलासारखा महत्त्वाचा डेटा चोरतात. हे मालवेअर कोणत्याही iPhone किंवा Android फोनला धोका पोहोचवू शकतात.
अशा परिस्थितीत, आपण Google Play Store किंवा App Store वरून अॅप्स डाउनलोड करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. थोडासा निष्काळजीपणाही सायबर क्राईमला बळी पडू शकतो. तुम्ही Google Play Store किंवा App Store वरुन कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज आहे.
1. स्पीड क्लीन, सुपर क्लीन आणि रॉकेट क्लीनर सारखे 'ऑप्टिमायझिंग' आणि 'क्लीनिंग' अॅप्स कधीही इंस्टॉल करु नका. अशा अनेक अॅप्समध्ये मालवेअर सापडले आहेत.
2. विश्वसनीय अॅप स्रोतावरून कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी अभिप्राय किंवा त्याची माहिती घेणे आवश्यक आहे. गूगलने गेल्या काही महिन्यांत प्ले स्टोअरवरील हजारो धोकादायक अॅप्सवर बंदी घातली आहे.
3. तुम्ही कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी, अॅपच्या डाऊनलोडची संख्या तपासा. नवीन अॅपसाठी मोठ्या संख्येने डाऊनलोडचा दावा करणे हे एक इशारा चिन्ह आहे. कारण फसवणूक करणारे यूसर्सना फसवण्यासाठी या युक्त्या वापरतात, म्हणून तुम्हाला लाखो डाऊनलोडचा दावा करणारे नवीन अॅप दिसल्यास, सावध रहा.
4.डेव्हलपर Google Play Store वर्णनामध्ये अॅपच्या सर्व तपशीलांचा उल्लेख करतात, ज्यामध्ये अॅपने कार्य करण्यासाठी आपल्या फोनवर प्रवेश करणे आवश्यक आहे.
5. अॅप डेव्हलपरने इतर कोणतेही नवे अॅप बनवले आहेत का, ते पाहण्यासाठी संशोधन करा. जर होय असे उत्तर असेल तर त्यांचा रिव्ह्यु देखील पाहा.