मोठी ऑफर : 40 हजारांचा Nokiaचा 43 इंच 4K Smart TV मिळतोय 12 हजार रुपयांना, पाहा काय आहे Offer

Flipkart TV Days Sale: फ्लिपकार्टवर टीव्ही डेज सेल सुरू आहे, जो 15 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. हा सेल 19 ऑगस्टपर्यंत चालेल (Flipkart TV Days Sale 15th To 19th Aug). या सेलदरम्यान स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहे.  

Updated: Aug 16, 2022, 10:52 AM IST
मोठी ऑफर : 40 हजारांचा Nokiaचा 43 इंच 4K Smart TV मिळतोय 12 हजार रुपयांना, पाहा काय आहे Offer   title=

मुंबई : Flipkart TV Days Sale: फ्लिपकार्टवर टीव्ही डेज सेल सुरू आहे, जो 15 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. हा सेल 19 ऑगस्टपर्यंत चालेल (Flipkart TV Days Sale 15th To 19th Aug). या सेलदरम्यान स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही घरासाठी सर्वोत्तम मानला जातो. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर ही योग्य संधी आहे. नोकियाचा 43-इंचाचा (Nokia 43 inch Ultra HD 4K LED Smart Android TV) स्मार्ट टीव्ही 12 हजार रुपयांना खरेदी करता येईल.  कसे ते जाणून घ्या.

Nokia 43 inch Ultra HD 4K LED Smart Android TV Offers And Discounts

नोकिया 43 इंच अल्ट्रा एचडी 4K एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची लॉन्च किंमत 40,000 रुपये आहे, परंतु सेल दरम्यान टीव्ही 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर 40 टक्के सूट आहे. यानंतर बँक आणि एक्सचेंज ऑफर आहेत. ज्यामुळे टीव्हीची किंमत आणखी कमी होते.

Nokia 43 inch Ultra HD 4K LED Smart Android TV Bank Offers

तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुम्हाला दोन ऑफर मिळतील. प्रथम तुम्हाला 1,200 रुपये सूट मिळेल. यानंतर त्वरित सवलत मिळेल. म्हणजेच टीव्हीची किंमत 22,799 रुपये असेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील आहे.

Nokia 43 इंच अल्ट्रा HD 4K LED स्मार्ट Android TV एक्सचेंज ऑफर

Nokia 65 inch Ultra HD 4K LED Smart Android TV वर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही जुना टीव्ही बदली केला तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. तुमच्या टीव्हीची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच 11 हजार रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे पूर्णपणे ऑफरसाठी पात्र ठराल आणि टीव्हीची किंमत 11,799 रुपये असेल.