Facebook पोस्ट आणि नोट्स आता Google डॉक्युमेंटमध्ये ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या नवीन फीचर

फेसबुकने एक भन्नाट फीचर लॉंच केले आहे.

Updated: Apr 20, 2021, 11:43 AM IST
Facebook पोस्ट आणि नोट्स आता Google डॉक्युमेंटमध्ये ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या नवीन फीचर title=

मुंबई :  फेसबुकने आपले भन्नाट फीचर लॉंच केले आहे. याची मदत घेऊन फेसबुक युजर्सची या फीचर्सच्या मदतीने आपले पोस्ट आणि नोट्स Google Document, Blogger, wordpress.com मध्ये ट्रान्सफर करता येणार आहे.  गेल्यावर्षी फेसबुकने फोटो व्हिडिओ ट्रान्सफर करण्यासाठी फीचर इनेबल केले होते. या माध्यमातून व्हिडिओ आणि फोटो Dropbox, GooglePhoto मध्ये ट्रान्सफर करता येत होते.

फेसबुक प्रायव्हसी आणि पब्लिक पॉलिसचे निर्देशक स्टवी सेटरफील्ड यांनी म्हटले की, लोकांच्या सुविधेसाठी आम्ही टूलचे नाव बदलले आहे. आता या टुलचे नाव ट्रान्सफर युवर इंन्फॉर्मेशन असणाऱ आहे. आम्ही या टूलला लोकांच्या सुरक्षा आणि प्रायव्हसीचा विचार करून बनवले आहे. यामध्ये ट्रान्सफर सुरू करण्याआधी दोनवेळा पासवर्ड टाकावा लागणार आहे. सुरक्षित पद्धतीतून डाटा ट्रान्सफर होऊ शकेल.

युजर्स या टुलला एक्सेस करण्यासाठी फेसबुकच्या सेंटिंगमध्ये युवर फेसबुक इन्फॉर्मेशनवर जाऊन क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल की तुम्हाला एक्स्पोर्ट कुठे करायचे आहे. तेथे  Google dox, Wordpress, blogger असे पर्याय मिळतील. कन्फर्म केल्यानंतर ते ट्रान्सफर होईल