हे आहेत WhatsApp चे टॉप सीक्रेट्स, तुम्हाला माहिती आहेत का?

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्यापैकी अनेकांचं व्हॉट्सअॅपशिवाय पानही हालत नाही. व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं एक चॅटिंग अॅप बनलं आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच अपडेट होत असतं त्यामुळे युजर्स या अॅपपासून दूरावले जात नाहीयेत.

Sunil Desale Updated: Mar 12, 2018, 07:46 PM IST
हे आहेत WhatsApp चे टॉप सीक्रेट्स, तुम्हाला माहिती आहेत का? title=

नवी दिल्ली : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्यापैकी अनेकांचं व्हॉट्सअॅपशिवाय पानही हालत नाही. व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं एक चॅटिंग अॅप बनलं आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच अपडेट होत असतं त्यामुळे युजर्स या अॅपपासून दूरावले जात नाहीयेत.

तुम्हीही व्हॉट्सअॅपचा वापर करत असालच. पण आपल्यापैकी अनेकांना व्हॉट्सअॅपचे फिचर्स माहिती नाहीयेत. पण काळजी करु नका आम्ही तुम्हाला आज अशा पाच ट्रिक्स सांगणारा आहोत ज्या जाणून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे.

१) व्हॉट्सअॅपवर पाहू शकता Youtube व्हिडिओ

सर्वात खास फिचर बाबत बोलायचं झालं तर, व्हॉट्सअॅपमध्ये तुम्ही युट्युब व्हिडिओसुद्धा पाहू शकता. तसेच युजर्स लाईव्ह व्हिडिओ पाहून चॅटही करु शकतात. आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर मिळणाऱ्या युट्युब लिंकसाठी वेगळी विंडो ओपन होत होती आणि युजर्स युट्युब अॅपवर स्विच होत होते. मात्र, आता नव्या अपडेट नंतर असं होणार नाही. कारण, तुम्ही थेट युट्युबचा व्हिडिओ पाहू शकणार आहात. हे फिचर पिक्चर इन पिक्चर (PiP) ला सपोर्ट करेल. यासोबतच युजर्स आता व्हिडिओ पाहता-पाहता चॅटही करु शकता.

२) फोटो आणि व्हिडिओत स्टिकर

व्हॉट्सअॅप युजर्स फोटो आणि व्हिडिओला स्टिकर्ससोबत पाठवू शकतात. आतापर्यंत स्टिकरचं ऑप्शन केवळ फेसबुकवर मिळत होतं मात्र, आता व्हॉट्सअॅपवर हा पर्याय उपलब्ध होणार आहे. हे फिचर अॅड झाल्याने युजर्सला चॅट ऑप्शनमध्ये स्टिकर मिळणार आहे.

युजर्स आपल्या फोटो आणि व्हिडिओला युनिक स्टिकर्ससोबत पाठवू शकणार आहेत. युजर्सला फोनमध्ये लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. लाईव्ह लोकेशन शेअरिंग फिचर आयफोन आणि अँड्राईड फोनमध्ये गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून आहे. 

३) मित्रांना करा पैसे ट्रान्सफर

व्हॉट्सअॅपने मनी ट्रान्सफरची सुविधा सुरु केली आहे. यावर तुम्ही कुठल्याही खातेधारकाला युनीफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करु शकता. रिपोर्टनुसार, हे पहिलं मोबाईल अॅप असेल जे डिजिटल पेमेंटसाठी मल्टी-बँक पार्टनरशिपवर काम करेल. व्हॉट्सअॅपने जून २०१७ मध्ये आपली इंस्टेंट पेमेंट सुविधा सुरु करण्यासाठी एसबीआय आणि एनपीसीआय सारख्या वित्तीय संस्थांसोबत चर्चा केली होती.

४) मेसेज डिलीट करण्याची सुविधा

व्हॉट्सअॅप युजर्ससाठी हे एक खूप चांगलं फिचर आहे. नवं फिचर delete for everyone च्या माध्यमातून चुकीने पाठवलेला मेसेज तुम्ही डीलिट करु शकता आयओएस आणि विंडोज फोन युर्जसाठी रिकॉल फिचर सुरु झाल्यापासून याची खूपच चर्चा होत आहे.

५) लॉस्ट ऑनलाईन लपवून ठेवणे

व्हॉट्सअॅपमध्ये बाय डिफॉल्ट लास्ट सीन आणि रिड रिसीटचा पर्याय ऑन असतो. मात्र, तुम्ही सेटिंगमध्ये जावून तो बदलू शकता. तुम्ही तुमचं प्रोफाईल पिक, स्टेटस मेसेज ही बदलू शकता. यासाठी तुम्हाला Everyone (प्रत्येकजण पाहू शकतो), My Contacts (केवळ माझ्या कॉन्टॅक्टमधील पाहू शकतात) आणि Nobody (कुणीही पाहू शकत नाही) यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. यासाठी तुम्ही Settings > Account > Privacy मध्ये बदल करु शकता.