मुंबई : आजकाल आपन काय करतो ? कुठे राहतो? काय खातो? कुठे फिरतोय? अशी प्रत्येक लहान सहान गोष्ट सोशल मीडीयावर अपडेट करण्याची घाई असते. पण नकळत या गोष्टीमुळे आपण आपली सुरक्षितता धोक्यात आणत असतो. म्हणूनच फेसबूकवर यापुढे या गोष्टी पोस्ट करण्यापूर्वी विचार नक्की करा.
तुमची पूर्ण जन्म तारीख कधीच सोशल मीडियावर पूर्ण टाकू नका. यामुळे तुमच्या वयाचा अंदाज लावता येतो. हे तर आहेच. पण यासोबतच तुम्ही चोरट्यांना महत्त्वाची माहिती देत आहात. यामध्ये अनेकदा पासवर्डचा संकेत असतो.
तुम्ही सिंगल असाल किंवा रिशेलनशीपमध्ये असाल त्याबाबत सोशल मीडियामध्ये जाहीर वाच्यता करणं टाळा. सिंगल मुलींना याचा अधिक त्रास होतो.
तुम्ही एकट्यानं फिरत असाल किंवा रात्रीच्या वेळी फिरत असाल तर लोकेशन टाकणं त्याबाबत डीटेल माहिती टाकणं टाळा. यामुळे एकट्या मुलींची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. काही अनोळखी आणि संधीसाधू लोकांना तुम्ही विनाकरण माहिती पुरवत आहात.
लहान मुलांचे फोटो खूपच निरागस असतात. मात्र त्यांचे फोटो सतत शेअर करणं टाळा. ऑनलाईन माध्यमातून लहान मुलांचे फोटो वापरून त्याचा दुरूपयोग केला जातो.
अनेकदा घरात एकटं असणं हा तरूण मुला मुलींना स्वातंत्र्याचा भाग वाटतो. पण एकटं असताना आनंदाच्या भरात ही माहिती सोशल मीडीयावर टाकू नका. यामुळे तुम्ही नकळत चोरट्यांपर्यंत ही माहिती पोहचवत आहात. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब फारच धोकादायक आहे.