मुंबई : सध्या ऑनलाईन बॅंकिगचा (Online Banking) मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. कोरोनामुळे यात आणखी वाढ लागलीये. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात जितकी वाढ झालीय, तितकीच वाढ ही फसवणूकीतही झाली आहे. चोरट्यांनी लुटमारीचा ऑनलाईन फंडा सुरु केलाय. या प्रकारे हे भामटे आपल्याला फोन करुन गुंतवून ठेवतात, अन बोलता बोलता आपल्याकडून वैयक्तिक माहिती काढून घेतात. (These are the 4 new ways in which most frauds are happening Axis Bank also issued an alert know the details)
गोपनिय माहिती शेअर करु नका, असं नागरिकांना वारंवार सांगितलं जातं. मात्र त्यानंतरही धमकावून, भिती दाखवून हे फ्रॉड लोकांना गंडा घालतात. दरम्यान सध्या सायबर क्राईम एक्सपर्ट्सनी फसवणुकीचा नवा मार्ग शोधून काढलाय. स्क्रीन शेअर या पद्धतीने आतापर्यंत अनेकांना गंडा घालण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर आता अॅक्सिस बँकेने आपल्या खातेधारकांसाठी अलर्ट जारी केलाय.
बॅंकेनुसार, सध्या Any Desk या डेस्कटॉप अॅपच्या मदतीने फसवणून केली जात आहे. Any Desk च्या माध्यमातून जगातून कुठूनही कोणाचाही कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉप ऑपरेट करता येतो. त्यामुळे या सायबर क्रिमिनिल्सकडून लोकांना फसवलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशा फेक कॉलपासून सावध रहावं. तसेच फसवणूक टाळण्यासाठी काय करावं, हे या बॅंकेच्या रिपोर्टच्या माध्यामातून जाणून घेऊयात.
बॅंकेने अलर्टमध्ये काय म्हटलंय?
बॅंकेने दिलेल्या अलर्टनुसार, ग्राहकांकडून मोबाईल एक्सेस घेण्यासाठी सायबर क्रिमीनिल्स बोलण्यात गुंतवून ठेवतात. हे क्रिमीनिल्स खालील 4 माध्यमातून फसवू शकतात. ते 4 मार्ग कोणते, जाणून घेऊयात.
- KYC अपडेट करण्याच्या निमित्ताने क्रिमीनिल्स तुम्हाला फोन करु शकतात.
- Any Desk किंवा Team Viewer सारखे डेस्कटॉप अॅप डाऊनलोड करायला सांगितलं जातं.
- तसेच ग्राहकांना फेक लिंक पाठवून ती ओपन करायला सांगितलं जाऊ शकतं.
- 9 आकडी कोड शेअर करायला सांगितलं जातं. हा कोड मिळाल्यानंतर हे फ्रॉडस्टार खातेधारकाचं डिव्हाईस अॅक्सेस मिळवतात. यानंतर ते तुमची सर्व वैयक्तिक माहिती मिळवतात. त्यामुळे वरीलपैकी कोणतीही माहिती या फेक कॉल करणाऱ्यांना देऊ नये.