चॅटिंगचा डबल डोस, भावना व्यक्त करणाऱ्या इमोजीस आता बोलणार

Soundmojis हे फीचर नक्की काय आणि कोणाला वापरता येणार? जाणून घ्या 

Updated: Jul 17, 2021, 09:49 PM IST
चॅटिंगचा डबल डोस, भावना व्यक्त करणाऱ्या इमोजीस आता बोलणार title=

मुंबई: फेसबुक असो किंवा Whatsapp आपण चॅटिंगसाठी इमोजिचा जास्त वापर करतो. एकमेकांना बडबडण्यापासून ते प्रेम व्यक्त करण्यापर्यंत अनेक ठिकाणी चॅटिंगची जागा इमोजीने घेतली आहे. आता याची मजा आणखी द्विगुणीत करण्यासाठी खास फीचर फेसबुककडून लाँच करण्यात आलं आहे. इमोजी बोलणार असल्यानं चॅटिंगचा डोस डबल होणार आहे. 

फेसबुकने नवीन फीचर लाँच केलं आहे. या फीचरचं नाव  Soundmojis असं आहे. या इमोजीला आवाज देण्यात आले आहेत. त्यामुळे हे इमोजी बोलणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तुम्हाला चॅटिंगमध्ये साऊंडचा जादा पर्याय देण्यात आला आहे. तिथून तुम्हाला हे इमोजी वापरता येणार आहे. 

चॅटिंग दरम्यान वापरण्यात येणाऱ्या इमोजीमध्ये याचा वापर करता येणार आहे. यावेळी इमोजीच्या बरोबर एक छोटी ऑडिओ क्लिप देखील असेल. उदाहरणार्थ, आपण टाळी वाजवत इमोजी पाठवला तर टाळी वाजल्याचा आवाज येईल. जर हसण्याचा इमोजी पावला तर त्यातून हसण्याचा आवाज येणार आहे. त्यामुळे चॅटिंग करताना आता आणखी मजा येणार आहे. 

साउंडमोजी पाठविण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला फेसबुक मेसेंजर डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर चॅटिंगमध्ये जाऊन मचकूर लिहावा लागेल. तिथे इमोजी पर्याय असेल तिथे आवाजाचा एक जादा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर लाऊडस्पीकरचं चिन्हं दिसेल. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला खाली इमोजी दिसतील. तुम्हाला हवा असलेल्या इमोजीवर सिलेक्ट करून तो पाठवून द्यायचा आहे.