पैशांची बचत करायची आहे? मग फोनमध्ये डाऊनलोड करा हे Apps

आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की, सेव्हिंग होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सेव्हिंग करण्यास मदत होईल.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 8, 2017, 10:17 PM IST
पैशांची बचत करायची आहे? मग फोनमध्ये डाऊनलोड करा हे Apps  title=
Representative Image

मुंबई : आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की, सेव्हिंग होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सेव्हिंग करण्यास मदत होईल.

पैशांची सेव्हिंग न होण्यामागचं कारण म्हणजे येणारं उत्पन्न आणि खर्च याचा योग्य पद्धतीने हिशोब न ठेवणं. पण तुम्ही स्मार्टफोनमधील काही अॅप्सच्या मदतीने सेव्हिंग करु शकता हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही खास माहिती सांगणार आहोत.

तुम्ही स्मार्टफोनच्या मदतीने बचत आणि मनी मॅनेजमेंट करु शकता. मात्र, त्यासाठी तुमच्या फोनमध्ये काही अॅप्स असणं गरजेचं आहे. हे अॅप तुमचा खर्च नियंत्रणात आणण्यास तर मदत करतीलच त्यासोबत गुंतवणूक करण्याचाही सल्ला देतील.

हे अॅप्लिकेशन तुम्हाला तुमच्या खर्चाची मर्यादेसंदर्भात आठवण करुन देतील. जर तुम्ही गुंतवणूक करत आहात तर हे अॅप तुम्हाला मदत करेल. तुमचं बिल भरण्याची तारीख जवळ आली आहे तरीही अॅप तुम्हाला आठवण करुन देतील. इतकेच नाही तर हे अॅप वापरल्यास तुम्हाला क्रेडिट स्कोरही मिळणार आहे.

Mint 

फ्रीमध्ये मिळणारं मिंट हे अॅप तुमचं बजेट बनविण्यासाठी आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. तसेच पैशांचा वापर स्मार्ट पद्धतीने कसा करता येईल हे सुद्धा मिंट सांगतं. या अॅपला तुमच्या बँक खात्याची तसेच क्रेडिट कार्ड अकाऊंट्सची माहिती तुम्ही जोडू शकता. यामुळे तुमची संपूर्ण फायनान्शियल अॅक्टिव्हिटी एका प्लॅटफॉर्मवर येते.

Goodbudget

बजेट बनविण्यासाठी गुडबजेट हे अॅप नागरिकांना खूप पसंतीस पडत आहे. हे अॅप अॅड्रॉईड किंवा आयओएस फोनमध्ये प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येतं. या अॅपच्या माध्यमातून खर्च आणि उत्पन्न या दोघांचं ट्रॅकींग करता येतं. 

Monefy

मोनफाई हे फ्री आणि सर्वात सोप असं पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट अॅप आहे. 

Moneymanager

या अॅपचं व्हिज्युअल एक्सपिरियंस खूपच चांगलं आहे. याच्या माध्यमातून तुमचा पैसा कुठं जात आहे हे तुम्हाला लक्षात येईल. हे अॅप तुम्ही फ्रीमध्ये डाऊनलोड करु शकता.