Fly Above Traffic: तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. एका क्लिकवर आपल्याला संपूर्ण जगाची माहिती मिळते. आता ऑटोक्षेत्रातही नवी क्रांती होत आहे. प्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्लाइंग टॅक्सीची (Flying Taxi) चर्चा आहे. चिनी कंपनीने इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीची दुबईत चाचणी केली. कंपनीने भविष्यातील तंत्रज्ञानाची (Fly above traffic) झलक दाखवून दिली आहे. ही चाचणी मानवरहित होती. पण जुलै 2021 मध्ये मानवयुक्ती उड्डाण चाचणी केल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या फ्लाइंग टॅक्सीमधून दोन प्रवासी जाऊ शकतात. या फ्लाइंग टॅक्सीचा स्पीड ताशी 130 किमी आहे. प्रवासी वाहतूक करताना ठरल्या ठिकाणी फ्लाइंग टॅक्सी उतरेल आणि प्रवाशांना घेऊन जाईल असं कंपनीनं सांगितलं आहे.
सध्या रस्त्यावर ड्रायव्हरलेस गाड्यांचा बोलबाला आहे. या गाड्यांमध्ये टेस्ला कंपनी आघाडीवर आहे. त्यामुळे भविष्यात पायलटलेस फ्लाइंग टॅक्सी असेल का? याबाबत चर्चा रंगली आहे. पंरतू बॅटरी लाईफ, हवाई वाहतूक नियंत्रण, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांचा अभाव पाहता या क्षेत्रात अजून मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे.
Electric Car घेणं खिशाला परवडणार! Tata Tiago पेक्षा स्वस्त गाडी येणार बाजारात
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मे महिन्यात सांगितलं होतं की, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडातील चाचण्या संपल्यानंतर भारतात eVTOL च्या रूपाने शहरी हवाई वाहतुकीला गतिशीलता असेल. अमेरिका आणि कॅनडामधील अनेक कंपन्याशी चर्चा सुरु असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं.