Technology : ट्रेनमधले पंखे चोरीला का जात नाहीत? वापरण्यात आलीय 'ही' टेक्निक

Technology : रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. रेल्वेचं नुकसान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेत लावण्यात आलेले पंखे कधीच चोरीला जाऊ शकत नाहीत. कारण यासाठी रेल्वेने आयडीयाची कल्पना वापरली आहे. जाणून घेऊया काय आहे हे तंत्रज्ञान

राजीव कासले | Updated: Oct 14, 2023, 10:24 PM IST
Technology : ट्रेनमधले पंखे चोरीला का जात नाहीत? वापरण्यात आलीय 'ही' टेक्निक title=
संग्रहित फोटो

Railway's Fan: भारतीय रेल्वे (Indian Raiway) जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे. भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थिती चोरांपासून रेल्वेची संपत्ती वाचवणं हे रेल्वे व्यवस्थापनासमोर एक मोठं आव्हान असतं. रेल्वेतील स्विच, बल्ब चोरी झाल्याच्या घटना काही वर्षांपूर्वी होत होत्या. पण यानंतर रेल्वेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं. त्यामुळे रेल्वेत चोरीच्या घटना कमी झाल्या. रेल्वेतील पंखा चोरायचा विचार केला तरी चोरता येणार नाही. 

रेल्वेत पंखे चोरी होऊन नयेत यासाठी तंत्रज्ञान
स्विच, बल्बबरोबरच रेल्वेतील पंख्यांची (Railway Fan) चोरी झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वेने नवं तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. या नव्या तंत्रज्ञानाच्या (Technology) आधारे इंजिनिअर्सने पंख्यांचं अशा प्रकारे डिझाईन केलं आहेकी ते घरात किंवा दुकानात वापरता येणार नाहीत. केवळ ट्रेनमध्येच हे पंखे वापरता येऊ शकतात. आता घरात हे पंखे का लागू शकत नाहीत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घेऊया त्याचं उत्तर काय आहे. 

केवळ ट्रेनमध्येच लागू शकतात हे पंखे
आपल्या घरात दोन प्रकारची वीज वापरली जाते. पहिला AC म्हणजे Alternate Current आणि दुसरा DC म्हणजे Direct Current. आपल्या घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या अल्टरनेट करंटची कमाल शक्ती 220 व्होल्ट आहे आणि जेव्हा डायरेक्ट करंटचा घरात वापर केला जातो तेव्हा तो फक्त 5, 12 किंवा जास्तीत जास्त 24 व्होल्ट इतका असतो. याच गोष्टींचा विचार करुन इंजिनिअर्सने ट्रेनमध्ये लागणारे पंखे 110 व्होल्टचे बनवले आहेत आणि जे फक्त DC वर चालू शकतात. त्यामुळे विचार केला तरी हे पंखे घरात वापरता येऊ शकत नाहीत. 

महत्वाचं म्हणजे ट्रेनमधून पंखा चोरलाच तर त्या व्यक्तीला 7 वर्षांची जेल आणि आर्थिक दंड लागू शकतो.