Independence Day 2023: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानिमित्ताने गेल्या वर्षी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात केली. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन पीएम मोदी यांनी केलं होतं. यावर्षी सोशल मीडिया अकाऊंच्या डीपीवर तिरंग्याचा फोटो लावण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर डीपीमध्ये (DP) तिरंगा ठेवला आहे. पण ट्विटरवर तिरंगा फोटो ठेवताच अनेकांच्या अनेकांच्या अकाऊंटवर ब्ल्यू टिक गायब झाली आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यापासून बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरुन Blue Tick काढण्यात आलं आहे. याशिवाय अनेक युजर्सच्याबाबतीही हेच घडलं आहे. पण याबाबत घाबरण्याचं कारण नसल्याचं ट्विटरने स्पष्ट केलं आहे.
Twitter चा नियम काय आहे
ट्विटरच्या नियमानुसार युजरनने आपल्या अकाऊंटवरील प्रोफाइल फोटो बदलल्यानंतर अकाऊंटवर Blue Tick हटवला जाईल. पण तो तात्पपूरत्या स्वरुपात असेल. फोटोची पडताळणी केल्यानंतर युजर्सला पून्हा ब्ल्यू टिक दिला जाणार आहे. पडताळणीसाठी किती वेळ लागणार याबाबत ट्विटरने कोणतीही माहिती दिलेली नाही.
Elon Musk यांनी केले होते बदल
उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटरचे मालकी हक्क घेतल्यानंतर ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शनबाबतही बदल केले. यानुसार युजरला वेबच्या ब्ल्यू टिकसाठी 650 रुपये तर अॅपच्या ब्ल्यू टिकसाठी 900 रुपये मोजावे लागत आहेत. याआधी ब्ल्यू टिक काही अटिंची पूर्तता केल्यानंतर मिळत होता.
यांचं ब्ल्यू टिक गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपला डीपी बदलला आहे. यात अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, संस्था यांच्यासह सामान्य लोकांचाही समावेश आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा समावेश आहे. या सर्वांनी डीपी बदलल्यानंतर ब्ल्यू टिक हटवण्यात आलं आहे.
Blue Tick चे फायदे
ट्विटरवर ब्ल्यू टिक मुळे युजरची सत्यता कळते. सोशल मीडियावर एकाच नावाचे अनेक अकाऊंट असू शकतात. मायक्रोब्लॉगिंग साइटवर एकाच नावाची अनेक खाती असू शकतात. ब्ल्यू टिकमुळे युजरच्या खऱ्या खात्याची ओळख पटते.