मुंबई : डीटीएच आणि ओटीटीमध्ये भारताची अग्रगणी टाटा स्कायने प्रति महिना अवघ्या ७५ रुपयांत जबरदस्त ऑफर आणलीये. यासाठी ग्राहकांना अतिरिक्त इंटरनेट कनेक्शनची गरज पडणार नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन सर्व ग्राहकांसाठी माफक दरात उपलब्ध होणार आहे. हा कंटेट केवळ लार्ज स्क्रीनवरच उपलब्ध होणार नाही तर ग्राहकांना मोबाईल अथवा लॅपटॉपसारख्या गॅजेटवरही पाहता येणार आहे.
स्कायचे मुख्य कंटेट ऑफिसर अरुण उन्नी म्हणाले, टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनच्या लाँचिंगसह आम्ही सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या चाहत्यांसाठी केवळ हॉलीवूडच नव्हे तर जगभरातील स्टोरीज ६५० तास जाहिरात फ्री दाखवल्या जाणार आहेत. आमच्या यादीत जगातील लोकप्रिय आणि समीक्षकांकडून कौतुक केले गेलेले सिनेमे आणि टीव्ही शो यांचा समावेश आहे.
पहिल्यांदा एखादा डीटीएच प्लॅटफॉर्म जाहिरात फ्री सेवा देत आहे. ही सर्व्हिस २४ तास सुरु राहणार आहे. यातील अनेक असे शो आहेत जे याआधी भारतात टीव्हीवर पाहिले गेलेले नाहीयेत.
मोबाईलप्रमाणे जर तुम्ही केबल सेवेकडून संतुष्ट नाही आहात अथवा त्यांच्या मासिक प्लानसाठी तुम्हाल अधिक पैसे द्यावे लागत असतील तर तुम्हाला केबल सर्व्हिस बदलण्यासाठी सेट टॉप बॉक्स बदलण्याची गरज नाही. लवकरच मोबाईल ऑपरेटर्सप्रमाणे डीटीएच आणि केबल ऑपरेटर्सलाही पोर्ट करता येणार आहे.