नवी दिल्ली : कार घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण झाले नसेल तर या वर्षातच तुम्हाला ही संधी आहे.कारण ईयर एंड सेलमध्ये टाटा आपल्या ५ मॉडेल्सवर खास ऑफर देत आहे.
'मेगा ऑफर मॅक्स सेलिब्रेशन कॅम्पेन' या ऑफरमध्ये १ लाखापर्यंत स्वस्त कार मिळणार आहे. डायरेक्ट कॅशबॅकने हा फायदा मिळणार आहे. १ जानेवारी २०१८ नंतर या ऑफरमध्ये बदल केले जाणार आहेत.
टियागोपासून सफारी पर्यंत कार्सवर डिस्काऊंट आहे. टाटाच्या ५ मॉडेलमध्ये टियागो, जेस्ट, हेक्जा, सफारी स्टॉर्म आदिंवर डिस्काऊंट मिळत आहे.
टाटा डिस्काऊंट देत असलेल्या डिस्काऊंटमध्ये सफारी स्टॉर्मवर सर्वात मोठी सूट देण्यात आली आहे. कारवर १ लाखाची सूट देण्यात आली आहे. कारचा सर्वात कमी डिस्काऊंट २६ हजार रुपयांचा आहे. नवी दिल्लीत एक्स शोरूम किंमत १२.३६ लाख रुपये आहे.
यावर २६ हजार रुपयांचे थेट डिस्काऊंट मिळत आहे. यासाठी तुम्हाला कॅश व्यवहार करावा लागणार आहे. दिल्लीत याची एक्स शोरू किंमत ३.२१ लाख रुपये आहे.
या कारवर ३२ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेल असे दोन्ही मॉडेल आहेत. याच्या बेस मॉडेलची किंमत ४.६५ लाख रूपये आहे.
यावर ६८ हजार रुपयांची मोठी सूट आहे.यासाठीदेखील कॅश व्यवहार करणे गरजेचे आहे. पेट्रोल-डिझेल असे दोन्ही मॉडेल यामध्ये उपलब्ध आहेत. याची एक्स शोरूम किंमत ५.२२ लाख रुपये आहे.
बाजारात असणाऱ्या महिंद्रा एक्सयूवी ५०० सोबत या गाडीची स्पर्धा आहे. या गाडीवर टाटा ७८,००० रुपयांचे डिस्काऊंट देत आहे. याची एक्स शोरूम किंमत १४.८२ लाख रुपये आहे.