व्हॉट्स अ‍ॅपवरील 'मिडलफिंंगर' ची इमोजी हटवण्यासाठी लीगल नोटीस

व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आजकाल प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र भारतात व्हॉट्सअ‍ॅपला एका वकिलाने लीगल नोटीस पाठवली आहे.  

Updated: Dec 27, 2017, 08:04 PM IST
व्हॉट्स अ‍ॅपवरील 'मिडलफिंंगर' ची इमोजी हटवण्यासाठी लीगल नोटीस   title=

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आजकाल प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र भारतात व्हॉट्सअ‍ॅपला एका वकिलाने लीगल नोटीस पाठवली आहे.  

का पाठवली नोटिस ? 

भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशामध्ये सार्‍याच स्तरावर संस्कृतीचे पालन केले जाते. मात्र व्हॉट्स अ‍ॅपने त्यांच्या इमोजीमध्ये 'मिडल फिंगर'चा समावेश केल्याने नवा वाद रंगला आहे.

काय आहे मागणी ? 

 खुलेआम ' मिडल फिंगर' दाखवणे ही आपली संसकृती नाही. त्याच्यामार्फत चूकीचा संदेश दिला जातो. तसेच हे अपमानजनक आहे. त्यामुळे  ही इमोजी काढून टाकावी अशाप्रकारची लीगल नोटीस व्हॉट्स अ‍ॅपला पाठवण्यात आली आहे.  


येत्या १५ दिवसांमध्ये  'मिडल फिंगर' इमोजी काढून टाकावी अशी मागणी करण्यात आली आहे.