हा आहे ३००० रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा स्मार्टफोन

स्मार्टफोनच्या जगात दररोज नव-नवे स्मार्टफोन्स बाजारात येत आहेत. युजर्स स्वस्तात मस्त फोन घेण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फोनसंदर्भात सांगणार आहोत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 24, 2017, 04:43 PM IST
हा आहे ३००० रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा स्मार्टफोन title=

नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या जगात दररोज नव-नवे स्मार्टफोन्स बाजारात येत आहेत. युजर्स स्वस्तात मस्त फोन घेण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फोनसंदर्भात सांगणार आहोत.

Swipe टेक्नोलॉजीजने आपल्या Neo सीरीजमध्ये एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा देशातील सर्वात स्वत ४जी स्मार्टफोन आहे. Swipe Neo Power हा स्मार्टफोन देशातील जवळपास सर्वच ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध आहे.

काय आहे खास?...

Swipe Neo Power या फोनमध्ये ४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. गोरिल्ला ग्लासही देण्यात आली आहे. १.३GHZ क्वाड-कोअर प्रोसेसर, ५१२MB रॅम आणि ४जीबी इंटरनज स्टोरेज देण्यात आलेला आहे. तसेच इंटरनल स्टोरेज तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवू शकता.

Swipe Neo Power हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ४G LTE च्यासोबतच, २G, ३G, वायफाय, ब्ल्यूटूथ, एफएम रेडिओ, ३.५ एमएम ऑडिओ पोर्ट आणि मायक्रो यूएसबी २.० पोर्ट देण्यात आलेला आहे.

हा फोन ब्लॅक, ग्रे आणि गोल्ड कलर्समध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये २५०० mAhची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी Swipe Neo Power मध्ये ऑटोफोकस आणि एलईडी फ्लॅशसोबत ५ MP चा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत बाजारात २,९९९ रुपये असून हा फोन सर्व ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध आहे.