Metro Viral Transgender Video: तृतीयपंथ्यांचं नाव घेतलं तरी अनेकांना भीती वाटते. बऱ्याचदा मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. मात्र अनेकदा या तृतीयपंथ्यांना पैसे नाकारल्यानंतर वादाला तोंड फुटतं. काहीवेळेस हे तृतीयपंथी आक्रमकही झाल्याचं पाहायला मिळतं. असाच काहीसा प्रकार नुकताच दिल्लीतील मेट्रोमध्ये घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वादा घालताना आवाज वाढवल्यानंतर एका तृतीयपंथ्याने कंबरेपर्यंत साडी वर करत वाद घालणाऱ्या माणसाच्या ओरडल्याचं दिसून आलं.
समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्ली मेट्रोमध्ये पैसे मागत फिरत असलेल्या दोन तृतीयपंथ्यांबरोबर प्रवाशाचा वाद झाला. पैसे देण्यावरुन या तृतीयपंथ्याबरोबर प्रवाशाचं भांडण झालं. या प्रवाशाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तृतीयपंथी त्याच्यावर ओरडू लागले. गोंधळ घालून लोकांचं लक्ष आकर्षित करुन घेतल्यानंतर या तृतीयपंथ्यांनी जोरजोरात आरडाओरड सुरु केला.
समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला एक तृतीयपंथी शिव्या देत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. मेट्रोच्या त्याच डब्यात बसलेल्या एका प्रवाशाने दुरून हा व्हिडीओ शूट केला आहे. समोरचा प्रवासी फारसा प्रतिसाद देत नसल्याचं पाहून संतापलेल्या तृतीयपंथ्यांपैकी एकाने आपली साडी वर करुन आपलं गुप्तांग या व्यक्तीला दाखवत आरडाओरड सुरु केली. हा प्रकार पाहून मेट्रोमधील अनेकांना धक्काच बसला. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे काहीही कारण नसताना गोंधळ घालणाऱ्या या तृतीयपंथ्यांना मेट्रोमध्ये कसं काय येऊ देतात असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. काय घडलं तुम्हीच पाहा...
Kalesh b/w a Guy and Transgender inside Delhi Metro over not giving him money
pic.twitter.com/0PZW9gGlC5— (@gharkekalesh) November 13, 2024
"तृतीयपंथी आता सगळीकडेच दिसू लागले आहेत. ट्रेन, बस, सिग्नल आणि आता अगदी मेट्रोमध्येही दिसत आहेत. अशेच होत राहिलं तर हे लोक लवकरच एअर इंडिया आणि इंडिगोमध्येही दिसतील. त्यांना तिथे पैसे मिळाले नाहीत तर ते आपल्या सगळ्यांना बाहेर काढतील याचा फक्त विचार करुन बघा," असं एकाने म्हटलं आहे. "मेट्रोमध्ये या लोकांना प्रवेश कसा देतात. ते लोक इथेही गोंधळ घालतील," असं अन्य एकाने म्हटलं आहे. "हा फार धक्कादायक प्रकार आहे. अशा लोकांना तातडीने अटक केली पाहिजे. काही तृतीयपंथ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. काहीजण पैसे देतात काही नाही देत. मात्र अशाप्रकारे गोंधळ घालणं चुकीचं आहे. सीआयएसएफचे जवान दिल्ली मेट्रोत नाही का? त्यांनी अशा प्रकरणात तातडीने कारवाई केली पाहिजे," असं हिमांशू यादव नावाच्या व्यक्तीने म्हटलं आहे.
नक्की पाहा >> Video: आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर 'तो' हॉस्पिटलच्या लॉबीमधून...
मात्र वाद निर्माण झालेला हा सारा प्रकार नेमका कोणत्या मार्गावर आणि कधी घडला ही माहिती समोर आलेली नाही.