तुमच्या तल्लख बुद्धीला ताण देऊन सांगा यामध्ये दडलेला आकडा; 99 टक्के लोक ठरले अपयशी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये याचं उदाहरण पाहता येत आहे. जिथं ही संकल्पना अधिक स्पष्टपणे मांडली गेली आहे.   

Updated: Feb 20, 2022, 02:41 PM IST
तुमच्या तल्लख बुद्धीला ताण देऊन सांगा यामध्ये दडलेला आकडा; 99 टक्के लोक ठरले अपयशी  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Optical Illusion Numbers : ऑप्टिकल इल्यूशन (Optical Illusion) म्हणजेच डोळ्यांना होणारा भास, तुम्ही कधी अनुभवला आहे का? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये याचं उदाहरण पाहता येत आहे. जिथं ही संकल्पना अधिक स्पष्टपणे मांडली गेली आहे. 

भलेभले बुद्धिमान हा फोटो पाहून गोंधळले. तुम्हीही त्यापैकीच एक आहात का?

दहा वेळा पाहुनही अनेकांना या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाही. जर तुम्ही अगदी योग्य निरीक्षण करत हा आक़डा ओळखला असेल, तर तो कमेंटमध्ये नक्की लिहा. 

@benonwine या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये एक वर्तुळ दिसत आहे. या वर्तुळामध्ये अशा रचनेमध्ये रेषा आहेत ज्यांच्या आत एक आकडा दडला आहे.

पण, बारकाव्यानं पाहूनही हा आकड़ा काही दिसेना. जवळपास 99 टक्के सोशल मीडिया युजर्सनी हा आकडा ओळखलेला नाही. 

काही युजर्सनी मोठ्या प्रयत्नांनी, डोळ्यात तेल टाकून या चित्राचं निरिक्षण केलं, जिथं त्यांना अखेर आकडा ओळखता आला. 

3452839 असा हा आकडा, फार कमी युजर्सनाच हा आकडा ओळखता आला आहे. तुम्ही ओळखलात की अपयशींच्या रांगेत जाऊन उभे राहिलात?